Viral Video: झिम्बाब्वेचा विजयी जल्लोष संपेना; संघासह, संपूर्ण देशात जल्लोष

पाकिस्तान विरोधातील विजयाने झिम्बाब्वेत उत्साहाची लहर
Zimbabwe Cricket
Zimbabwe CricketDainik Gomantak
Published on
Updated on

T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि झिम्बाब्वे (Pakistan Zimbabwe) यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एक धाव राखून पराभव केला. झिम्बाब्वेने दिलेल्या 131 धावांचे आव्हान पाकिस्तानला पूर्ण करता आले नाही. अखेरच्या चेंडू पर्यंत चालेल्या या थरारक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला धूळ चारत सामन्यात विजयी आघाडी मिळवली. झिम्बाब्वेच्या या विजयाचा जल्लोष सर्वत्र साजरा केला जात आहे.

Zimbabwe Cricket
Pak Vs Zim: पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव! एक धाव राखून झिम्बाब्वेने केले पराभूत

झिम्बाब्वेने संघाने पाकिस्तान विरोधातील विजय संघातील सहकाऱ्यांसह मैदानावर साजरा केला. यावेळी संघातील खेळाडूंनी झिम्बाब्वेतील एका गीतावर ठेका धरला, सर्व खेळाडू टाळ्या वाजवत मैदानावर नाचताना दिसत आहेत. संघाचे विविध प्रशिक्षक देखील यावेळी या आनंदात सामिल होताना दिसत आहेत. पाकिस्तानकडून मिळालेल्या विजयाचा झिम्बाब्वे संघ पूरेपूर आनंद घेताना दिसत आहेत.

झिम्बाब्वेच्या विजयाचा देशातील नागरिकांनी देखील उत्साह साजरा केला. शेवटच्या चेंडूवर संघाने विजयाला गवसणी घालताच झिम्बाब्वेच्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी नागरिक एकमेकांचे अभिनंदन करताना दिसत आहेत, तसेच शुभेच्छा देताना दिसत आहे. झिम्बाब्वेच्या क्रिकेट मंडळाने (Zimbabwe Cricket) हा व्हिडिओ शेअर केला आहे.

भारताकडून पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून दुसरा झटका बसला आहे. झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला आहे. केवळ एका धावेने पाकिस्तानचा पराभव झाला आहे. यामुळे पाकिस्तानचे T20 विश्वचषक स्पर्धेतील आव्हान आणखी कठिण झाले आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेले 131 धावांचे आव्हान पाकिस्तानला पूर्ण करता आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com