CSK vs GT IPL 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Final: चेन्नई उपविजेते? नरेंद्र मोदी स्टेडियममधील बिग स्क्रिनच्या फोटोमुळे चर्चेला उधाण

आयपीएल 2023 अंतिम सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवरील बिग स्क्रिनच्या एका व्हायरल फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Pranali Kodre

Photo of Big Screen Inside Narendra Modi Stadium goes viral: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. हा सामना रविवारी (28 मे) होणार होता. पण रविवारी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्याचमुळे हा सामना सोमवारी राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

सोशल मीडिया युजर्सने केलेल्या दाव्यांनुसार झाले असे की पावसामुळे सामना रविवारी सुरू झाला नव्हता. सर्वच जण पाऊस थांबण्याची वाट पाहात होते. त्याचवेळी स्टेडियममधील बिग स्क्रिनवर एक ग्राफिक झळकले, ज्यावर उपविजेता चेन्नई सुपर किंग्स असे लिहिलेले होते.

या बिग स्क्रिनने चाहत्यांचे लक्ष वेधले. त्या बिग स्क्रिनच्या फोटोवर सध्या चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

काही युजरने प्रश्न विचारला आहे की उपविजेता आधीच ठरला आहे का?, तर काही चाहत्यांनी कदाचीत स्टेडियममधील बिग स्क्रिनच्या सिस्टिमची तपासणी सुरू असू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता या फोटोने चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे.

दरम्यान, या फोटोमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही.

अंतिम सामना राखीव दिवशी

आयपीएल 2023 मधील चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा अंतिम सामना आता रविवारऐवजी सोमवारी खेळवला जाणार आहे. रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत सामना पाऊस थांबण्याची वाट पाहाण्यात आली.

पण पाऊसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच मैदानही ओले झाल्याने सामनाधिकाऱ्यांनी हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी घेण्याचा निर्णय घेतला. आता सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून त्यापूर्वी नाणेफेक घेतली जाईल.

कोण जिंकणार?

या अंतिम सामन्यात जर चेन्नई सुपर किंग्स विजय मिळवला, तर हे त्यांचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद असेल. तसेच गुजरात अंतिम सामना जिंकला, तर त्यांचे हे सलग दुसरे आयपीएल विजेतेपद असेल.

चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. तसेच गुजरातने गेल्यावर्षी पहिल्यांचा आयपीएलमध्ये खेळताना विजेतेपदाला गवसणी घातली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT