Ambati Rayudu Retire: IPL 2023 फायनलमध्ये अखेरचा खेळणाऱ्या रायुडूने CSK आणि MI साठी कधी जिंकल्यात ट्रॉफी? जाणून घ्या

IPL 2023 फायनलआधी अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा केली असून त्याने आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी विजेतीपदे जिंकली आहेत.
Ambati Rayudu
Ambati RayuduDainik Gomantak
Published on
Updated on

Ambati Rayudu announced Retirement from IPL: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू अंबाती रायुडूचा अखेरचा सामना ठरणार आहे. अंबाती रायुडूने ट्वीट करत निवृत्तीची घोषणा केली आहे.

त्याने ट्वीट केले आहे की 'दोन बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स, 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 अंतिम सामने आणि 5 ट्रॉफी आणि आशा आहे आज रात्री 6 वी ट्रॉफी असेल. हा शानदार प्रवास होता.'

'मी निर्णय घेतला आहे की आयपीएलमध्ये आजचा अंतिम सामना माझा अखेरचा सामना असेल. मी या स्पर्धेत खेळण्याचा पुरेपूर आनंद घेतला. सर्वांना धन्यवाद. आता यू टर्न नाही.'

Ambati Rayudu
IPL 2023, CSK vs GT: फायनलमध्ये पावसाचीच जोरदार बॅटिंग! मॅच रद्द झाल्यास 'हा' संघ होणार चॅम्पियन

दरम्यान, रायुडूने 2010 साली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. तो 2010 ते 2017 दरम्यान मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. या दरम्यान, त्याने 2013, 2015 आणि 2017 अशा तीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून आयपीएल ट्रॉफी जिंकली.

तसेच 2018 साली त्याचा चेन्नई सुपर किंग्स संघात समावेश झाला. त्याने 2018 आणि 2021 साली चेन्नई सुपर किंग्सकडू आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता त्याला चेन्नईकडून आणखी एक ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.

Ambati Rayudu
IPL 2023 Final: फायनलमध्ये चेन्नई - गुजरात संघात होणार बदल? पाहा कशी असून शकतात Playing XI

दरम्यान, 2010, 2013, 2015 आणि 2017 या आयपीएल हंगामात अंतिम सामन्यात पोहचलेल्या मुंबई संघाचा तो भाग होता. तसेच 2018, 2019, 2021 आणि 2023 या आयपीएल हंगामात अंतिम सामन्यात पोहचलेल्या चेन्नई संघाचाही आता तो भाग आहे. त्यामुळे तो रविवारी आयपीएलचा 8 वा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.

अंबाती रायुडूने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 203 सामने खेळले असून 28.29 च्या सरासरीने आणि 127.29 स्ट्राईक रेटने 4329 धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतकाचा आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com