आयपीएल-2022 (IPL-2022) ची तयारी जोरात सुरु झाली आहे. मेगा लिलावासाठी 10 फ्रँचायझींनी आपले संघ तयार केले आहेत. बीसीसीआयनेही शुक्रवारी लीगच्या आगामी हंगामाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. 26 मार्चपासून लीग सुरु होणार आहे. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. प्रेक्षक आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. खासकरुन महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) चाहते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असून तो आता फक्त आयपीएल खेळतो. आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वीच धोनीच्या नव्या लूकने चाहत्यांना आकर्षित केले आहे. चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) जर्सी परिधान करण्यापूर्वी धोनीने नवा ड्रेस परिधान केला आहे. (Before IPL 2022 MS Dhoni Is Seen In A New look)
दरम्यान, आयपीएलपूर्वी धोनी प्रत्येक वेळी नव-नव्या लूकमध्ये दिसतो. मागच्या वेळी त्याचा मस्करी करणारा लूक व्हायरल झाला होता. यावेळीही धोनीने वेगळा लूक धारण केलं आहे. आयपीएल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने दोन छोटे व्हिडिओ जारी केले आहेत, ज्यात धोनीचा हा नवा फॉर्म दिसत आहे.
धोनी ड्रायव्हर झाला
स्टार स्पोर्ट्सने जारी केलेल्या व्हिडिओंमध्ये धोनी ड्रायव्हर बनला आहे. अवघ्या पाच सेकंदांच्या व्हिडिओमध्ये धोनी ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये, मिशा आणि कुरळे केसांमध्ये वाहनाला ब्रेक लावताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये धोनी बसच्या पायऱ्यांवर बसला आहे. या दोन्ही व्हिडीओमध्ये त्याने ड्रायव्हरचा खाकी गणवेश परिधान केला आहे.
खरं तर, हा आयपीएलच्या पुढच्या सीझनच्या प्रोमोसाठी आहे, ज्यामध्ये धोनी ड्रायव्हर म्हणून येत आहे. हे दोन्ही त्याचे टीझर आहेत. पूर्ण प्रोमो काही दिवसात समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयपीएल नव्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार
बीसीसीआयने (BCCI) लीगचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी 10 संघ या लीगमध्ये सहभागी झाले आहेत. ज्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. लीगमध्ये एकूण 70 सामने खेळवले जातील. हे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. वानखेडे आणि पाटील स्टेडियमवर 20-20 सामने खेळवले जातील. उर्वरित दोन स्टेडियममध्ये 15-15 सामने आयोजित केले जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.