BCCI will make a comments on Virat Kohli, Sourav Ganguly Says no comments

 

Dainik Gomantak

क्रीडा

विराट कोहली प्रकरणावर सौरव गांगुलीचं 'नो कमेंट', BCCI घेणार निर्णय

विराटच्या वक्तव्यानंतर गुरुवारी सौरव गांगुली यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट वरील संकटे काही कमी होताना दिसत नाही आहेत. संघाचा सुपरस्टार फलंदाज आणि कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात 'कोण खरे, कोण खोटे' असा प्रश्न बोर्डासमोर निर्माण झाला आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाशी संबंधित निर्णय आणि त्यासंबंधीच्या वक्तव्यांनी मोठे वादळ निर्माण झाले आहे.(BCCI will make a comments on Virat Kohli, Sourav Ganguly Says no comments)

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौर्‍यापूर्वी झालेल्या गोंधळामुळे क्रिकेट चाहते, तज्ज्ञ तसेच बोर्ड आणि बीसीसीआय नेतृत्वाने या क्षणी कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून महत्त्वाच्या मालिकेपासून संघाचे लक्ष विचलित होऊ नये. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलून निर्णय घेतला आहे की, या प्रकरणाबाबत घाईने कोणतेही पाऊल उचलणे सध्या तरी योग्य होणार नाही.

16 सप्टेंबर रोजी भारताचे T20 कर्णधारपद सोडणाऱ्या विराट कोहलीला त्याच्या इच्छेविरुद्ध 8 डिसेंबर रोजी एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले. कोहलीला हटवण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, कारण शेवटच्या क्षणी कोहलीला या निर्णयाची माहिती देण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.यानंतर BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी कोहलीला T-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून थांबवले होते.मात्र 15 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी कोहलीने पत्रकार परिषदेत साऱ्या मुद्द्यांवर आपली बाजू मांडली आणि त्यात गांगुलीच्या वक्तव्यापासून अनेक गोष्टी वेगळ्या सांगितल्या आणि नेमका इथूनच गदारोळ सुरू झाला.

कोहलीच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआयकडून काय प्रतिक्रिया येते, याची प्रतीक्षा होती. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बुधवारी जे काही घडले त्यावर बीसीसीआयमधील कोणीही खूश नाही, परंतु त्यांना समजते की त्यांच्याकडून कोणतीही तीव्र प्रतिक्रिया या प्रकरणाच्या त्वरित निराकरणासाठी हानिकारक असू शकते.त्यामुळे यावर BCCI कडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. माहितीनुसार, गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बुधवारी 'झूम कॉल'वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली आहे. जिथे या साऱ्या प्रकरणाबाबत बोर्ड कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही किंवा प्रेस रिलीज जारी करणार नाही असा एकत्रितपणे निर्णय घेण्यात आला आहे.

विराटच्या वक्तव्यानंतर गुरुवारी सौरव गांगुली यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे .प्रसारमाध्यमांना दिलेल्या उत्तरात त्यांनी एवढेच सांगितले की, बोर्डच या प्रकरणाला सामोरे जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT