Team India BCCI
क्रीडा

Team India: फायनलमध्ये पोहचण्याचा आनंद अन् चहलची ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री; BCCI ने शेअर केला BTS व्हिडिओ

India vs New Zealand Semi-Final: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप 2023 सेमीफायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रुममधील कसे वातावरण होते, याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

Pranali Kodre

BCCI Shares BTS Video from Dressing Room after ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला पहिला अंतिम सामन्यात जाणारा संघ मिळाला आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 70 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

12 वर्षांची प्रतिक्षा संपली

न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवल्याने 12 वर्षांची वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळण्याची भारतीय संघाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. भारताने यापूर्वी 2011 वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामना खेळला होता. विशेष म्हणजे या अंतिम सामन्यात विजय मिळवत भारताने विश्वविजेतेपदालाही गवसणी घातली होती.

भारतीय संघाचा जल्लोष

दरम्यान, भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर जोरदार जल्लोष केला. तसेच या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये कसे वातावरण होते, याचा बिहाइंड द सीन व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी खेळाडू एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच स्टेडियममधून खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये येत असताना चाहतेही त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

यावेळी या सामन्यासाठी स्टेडियममध्ये भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलही उपस्थित होता. त्याला या स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. पण असे असले, तरी तो भारतीय संघाला सुरुवातीपासून पाठिंबा देताना दिसला होता.

दरम्यान, उपांत्य सामन्यानंतर तो भारतीय संघातील खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला भेटण्यासाठी ड्रेसिंग रुममध्येही पोहोचला. त्याने खेळाडूंची गळाभेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

तसेच बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की सामन्यानंतर जेव्हा भारतीय संघ हॉटेलकडे रवाना होत होता, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी होती. चाहते भारतीय संघाला पाठिंबा देत होते. तसेच हॉटेलमध्ये पोहचल्यानंतरही भारतीय संघाच्या नावाने जयघोष सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी खेळाडू एकमेकांची मस्ती करतानाही दिसत आहेत.

भारताने सलग 10 सामने जिंकले

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धचा विजय हा भारताचा वनडे क्रिकेटमधील सलग 10 वा विजय होता. भारताने पहिल्यांदाच वनडेत सलग 10 विजय मिळवले आहेत. यापूर्वी कधीही भारताला सलग 10 वनडे सामने जिंकता आले नव्हते.

भारतीय संघाने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत साखळी फेरीतील सर्व 9 सामने जिंकले, तसेच उपांत्य सामनाही जिंकला. आता अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT