Shreyas Iyer and Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

Team India: कमबॅकची प्रतिक्षा संपणार! बुमराह-श्रेयसच्या सर्जरीबद्दल BCCI चे मोठे अपडेट्स

बीसीसीआयकडून जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापत आणि सर्जरीबद्दल मोठे अपडेट्स देण्यात आले आहेत.

Pranali Kodre

Jasprit Bumrah and Shreyas Iyer Medical Updates: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतींचा सामना करत होते. आता त्यांच्या वैद्यकिय स्थितीबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) माहिती देण्यात आली आहे.

बुमराहची रिहॅबला सुरुवात

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहची पाठीवर न्यूझीलंडमध्ये काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच सध्या त्याला वेदना होत नाहीयेत. वैद्यकिय तज्ञांनी त्याला शस्त्रक्रियेनंतर 6 आठवड्यांच्या कालावधीनंतर रिहॅब करण्यास (पूर्वपदावर येण्यासाठी तयारी) सांगितले होते. त्यानुसार बुमराहने शुक्रवारपासून बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या रिहॅब मॅनेजमेंटला सुरुवात केली आहे.

श्रेयसची होणार शस्त्रक्रिया

बीसीसीआयने श्रेयसच्या दुखापतीबद्दल देखील माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात श्रेयसच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर दोन आठवड्यांसाठी तो सर्जनच्या देखरेखीखाली राहिल. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये परत येऊन रिहॅबिलिटेशन सुरू करेल.

बुमराह गेल्यावर्षापासून क्रिकेटपासून दूर

बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता. त्यानंतर अद्याप त्याचे पुनरागमन झालेले नाही. त्याला गेल्यावर्षी गेल्यावर्षी आशिया चषक आणि टी२० वर्ल्डकपलाही मुकावे लागले होते. तसेच त्याला यावर्षी आयपीएलही खेळता आलेले नाही. तसेच तो जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यालाही मुकणार आहे.

बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत कसोटीत 30 सामन्यांत 128 विकेट्स घेतल्या. तसेच 72 वनडे सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 70 विकेट्स घेतल्या आहेत.

अय्यरही क्रिकेटपासून दूर

श्रेयस अय्यर मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अखेरचे खेळला आहे. ही मालिका सुरू असताना त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढले होते. त्यापूर्वीही तो या दुखापतीच सामना करत होता. त्यामुळे तो देखील आयपीएल आणि आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यालाही मुकणार आहे.

श्रेयसने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10 कसोटी सामने खेळले असून 16 डावात फलंदाजी करताना 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 666 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 42 वनडे सामने खेळले असून 46.60 च्या सरासरीने 2 शतके आणि 14 अर्धशतकांसह 1631 धावा केल्या आहेत. त्याने 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 30.67 च्या सरासरीने 1043 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT