BCCI ची मोठी घोषणा! 2023-24 डोमेस्टिक क्रिकेट हंगामात होणार तब्बल 1846 सामने, पाहा टाईमटेबल

बीसीसीआयने मंगळवारी 2023-24 हंगामातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
BCCI Domestic Season 2023-24
BCCI Domestic Season 2023-24Dainik Gomantak
Published on
Updated on

BCCI announces domestic season for 2023-24: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी 2023-2024 हंगामातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या हंगामात जून २०२३ च्या अखेरीपासून ते मार्च 2024 पर्यंत सर्व स्पर्धांचे मिळून तब्बल 1846 सामने खेळवले जाणार आहेत.

कोविड-19 च्या संकटानंतर पहिल्यांदाच जवळपास संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यंदा खेळवला जाणार आहे. या हंगामाला 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीने सुरुवात होईल. दुलीप ट्रॉफी 28 जून ते 16 जुलै दरम्यान खेळवण्यात येईल. त्यानंतर 23 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान तब्बल तीन वर्षांनी प्रोफ. देवधर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे.

या दोन्ही स्पर्धा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य आणि ईशान्य अशा 6 विभागीय संघात खेळवण्यात येणार आहे. यानंतर 1 ऑक्टोबरपासून सौराष्ट्र आणि शेष भारत संघात इराणी कप होईल.

BCCI Domestic Season 2023-24
IPL 2023: RCBच्या पराभवानंतर कॅप्टन डू प्लेसिसला लाखांचा दंड; आवेश खानलाही फटकारले

या प्रथम श्रेणी स्पर्धांनंतर मर्यादीत षटकांच्या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. सईद मुश्ताक अली ट्रॉफी 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या दरम्यान होईल, त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2023 या दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धांमध्ये भारतातील एकूण 38 संघ सहभाग घेतली. या 38 संघांचे 5 गटात विभागणी होईल, दोन गटात प्रत्येकी 7 संघ असतील, तर तीन गटात प्रत्येकी 8 संघ असतील.

महत्त्वाचे म्हणजे 2024 च्या सुरुवातीलाच रणजी ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. खरंतर रणजी ट्रॉफी वर्षाच्या अखेरीस सुरू होत असते, पण यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे.

बीसीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे 5 जानेवारी 2024 रोजी रणजी ट्रॉफीला सुरुवात होईल. ही स्पर्धा 14 मार्च 2024 पर्यंत चालेल. या स्पर्धेतही 38 संघ सहभागी होणार असून त्यांचे 5 गटात विभाजन होईल. चार गट एलिट गट असतील. या चार एलिट गटांमध्ये प्रत्येकी 8 संघांचा समावेश असेल. तसेच उर्वरित एक गट प्लेट गट असेल. या प्लेट गटात 6 संघ असतील.

BCCI Domestic Season 2023-24
Rinku Singh: बेताची परिस्थिती, डोक्यावर कर्ज, BCCI कडून निलंबन... पण संकटांवर मात करत मिळवली नवी ओळख

रणजी ट्रॉफीत एलिट गटात असलेल्या संघांना साखळी फेरीदरम्यान प्रत्येकी सात सामने खेळावे लागणार आहेत. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश करतील. तसेच प्लेट गटातील संघ साखळी फेरीत प्रत्येकी 5 सामने खेळतील. त्यानंतर अव्वल 4 संघ प्लेट गटाच्या उपांत्य फेरीत पोहचतील. त्यानंतर उपांत्य फेरीत विजय मिळवणाऱ्या दोन संघात प्लेट गटाचा अंतिम सामना पार पडेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्लेट गटात अंतिम सामन्यात पोहचलेल्या दोन संघांना 2024-25 हंगामासाठी एलिट गटात बढती मिळेल. पण चार एलिट गटातील सर्व संघांची कामगिरी पाहून सर्वात खाली राहणाऱ्या दोन संघाची 2024-25 हंगामासाठी प्लेट गटात घसरण केली जाईल.

ऑक्टोबरपासून महिला देशांतर्गत हंगामाला सुरुवात

महिला देशांतर्गत स्पर्धांना ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होईल. 19 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान वरिष्ठ महिला टी20 ट्रॉफी खेळवली जाईल. त्यानंतर 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 दरम्यान वरिष्ठ महिला आंतर विभागीय ट्रॉफी खेळवली जाईल. यानंतर 4 ते 26 जानेवारी 2024 दरम्यान वरिष्ठ महिला वनडे ट्रॉफी खेळवली जाईल.

BCCI Domestic Season 2023-24
BCCI Domestic Season 2023-24www.bcci.tv

दरम्यान, 2023-24 या हंगामात कर्नल सीके नायुडू ट्रॉफी, विनू मंकड ट्रॉफी, कूच बिहार ट्रॉफी, विजय मर्चंड ट्रॉफी, विझी ट्रॉफी, महिला अंडर-19, महिला अंडर-23, महिला अंडर-15 अशा विविध वयोगटातील स्पर्धाही खेळवल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com