भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चालू हंगामात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या रणजी करंडकांसह सर्व वयोगटातील देशांतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बोर्ड लवकरच देशांतर्गत स्पर्धांबद्दल निर्णय घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच, यावेळी बीसीसीआयने 2021 हंगामात तीन मोठ्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (BCCI announces Ranji Trophy season)
बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या वेळी इराणी चषकशिवाय देवधर ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी 2021-21 च्या मोसमात आयोजित केली जाणार नाही. महत्वाचे म्हणजे यावेळी बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी तसेच रणजी करंडक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या 2021-22 देशांतर्गत हंगामात एकूण 2127 सामने प्रस्तावित असून त्यात 16 नोव्हेंबरपासून सर्वात महत्वाची रणजी करंडक होणार आहे.
बीसीसीआयला मागील हंगामात कोरोनाव्हायरसमुळे रणजी करंडक रद्द करणे भाग पडले होते. या कालावधीत त्यांनी कोणत्याही वयोगटातील स्पर्धा आयोजित केली नव्हती.बीसीसीआयने आपल्या जुन्या प्रस्तावात काही बदल करून नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.