U19 team India X/ACCMedia1
क्रीडा

U19 World Cup 2024: टीम इंडियाची 'यंगिस्तान' सज्ज! BCCI जाहीर केला 15 जणांचा संघ

U19 Team India Squad: पुढीलवर्षी खेळवल्या जाणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेसाठी युवा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

BCCI announced India U19 squad for ICC Men’s U19 World Cup 2024 and tri-series in South Africa:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी (11 डिसेंबर) 15 व्या 19 वर्षांखालील पुरुष वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केल्यानंतर लगेचच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या तिरंगी वनडे मालिकेसाठी आणि दक्षिण आफ्रिकेतच खेळवल्या जाणाऱ्या 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकपसाठी 19 वर्षांखालील भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली.

19 वर्षांखालील वनडे तिरंगी मालिका भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात 29 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान 19 वर्षांखालील वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.

या स्पर्धांसाठी 15 खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली असून पंजाबच्या उदय सहारनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच उपकर्णधारपद मध्यप्रदेशचा सौमी कुमार पांडे सांभाळेल.

त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून अरावेल्ली अविनाश राव आणि इन्नेश महाजन यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर या संघात धनुश गावडा, राज लिंबानी, मुशीर खान, आर्शिन कुलकर्णी, सचिन धास अशा खेळाडूंचाही समावेश आहे.

याशिवाय राखीव खेळाडू म्हणून प्रेम देवकर, अंश गोसाई आणि मोहम्मद अमान यांची निवड झाली असून ते दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघाबरोबर जाणार आहेत. तसेच पर्यायी खेळाडू (Back-up) म्हणून दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विग्नेश आणि किरन चोरमळे यांची निवड झाली आहे.

तिरंगी मालिका आणि 19 वर्षांखालील वर्ल्डकपसाठी भारतीय संघ -
आर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयुर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अविनाश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इन्नेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गावडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

भारतीय संघाचे वर्ल्डकपमधील सामने

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत साखळी फेरीसाठी भारतीय संघाचा अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह बांगलादेश, आयर्लंड आणि युएसए या संघांचा समावेश आहे.

साखळी फेरीत भारतीय संघ पहिला सामना 20 जानेवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 25 जानेवारीला आयर्लंडविरुद्ध आणि 28 जानेवारीला युएसएविरुद्ध भारताचा सामना होईल. हे तिन्ही सामने ब्लोएमफाँटेनला होणार आहेत.

या सामन्यांनंतर जर भारतीय संघ अ गटात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिला, तर सुपर सिक्स फेरी खेळेल.

तसेच या स्पर्धेपूर्वी भारताचा पहिला सराव सामना 13 जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 17 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT