U19 Asia Cup: भारताचा 'राज' चमकला! 13 धावांतच 7 विकेट्स मिळवत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

Raj Limbani Record: 19 वर्षांखालील आशिया चषकात भारताकडून राज लिंबानीने नेपाळविरुद्ध 7 विकेट्स घेत एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
Raj Limbani | Team India | U19 Asia Cup 2023
Raj Limbani | Team India | U19 Asia Cup 2023X/ACCMedia1
Published on
Updated on

U19 Asia Cup 2023, India vs Nepal, Raj Limbani 7 wickets for 13 runs record

मंगळवारी 19 वर्षांखालील आशिया चषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने अखेरच्या साखळी सामन्यात नेपाळला 10 विकेट्सने पराभूत केले. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.

भारताच्या या विजयाचा हिरो ठरला तो 18 वर्षीय राज लिंबानी. त्याने या सामन्यात 9.1 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 13 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने एक खास विक्रमही केला.

तो 19 वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

Raj Limbani | Team India | U19 Asia Cup 2023
U19 World Cup 2024 स्पर्धेचे वेळापत्रक घोषित! युवा टीम इंडिया 'या' संघांशी करणार दोन हात

19 वर्षांखालील वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी

19 वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचाच इरफान पठाण आहे.

इरफानने 4 नोव्हेंबर 2003 रोजी 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतच बांगलादेशविरुद्ध 16 धावा देत 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा लॉईड पोप आहे. त्याने 23 जानेवारी 2018 रोजी 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध ३५ धावांत ८ विकेट्स घेतल्या होत्या.

19 वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन-

  • 9/16 - इरफान पठाण (भारत विरुद्ध बांगलादेश, 2003)

  • 8/35 - लॉईड पोप (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2018)

  • 7/13 - राज लिंबानी (भारत विरुद्ध नेपाळ, 2023)

  • 7/19 - जीवन मेंडिस (श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, 2002)

  • 7/19 - मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, 2017)

  • 7/20 - ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड विरुद्ध मलेशिया, 2008)

Raj Limbani | Team India | U19 Asia Cup 2023
U19 Asia Cup: टीम इंडियाने नेपाळला दाखवलं आस्मान, 10 विकेट्सने विजयासह सेमीफायनलच्या आशाही कायम

भारताचा विजय

राजने मंगळवारी केलेल्या कामगिरीमुळे नेपाळला 50 धावांचा टप्पाही पार करण्यासाठी संघर्ष करावा लागला. नेपाळचा संघ 22.1 षटकात 52 धावांवर सर्वबाद झाला. नेपाळकडून एकाही फलंदाजाला 10 धावाही करता आल्या नाहीत. भारताकडून राजव्यतिरिक्त आराध्य शुक्लाने 2 विकेट्स घेतल्या, तर आर्शिन कुलकर्णीने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 53 धावांचे आव्हान भारताने  7.1 षटकातच एकही विकेट न गमावता 57 धावा करत पूर्ण केले. भारताकडून सलामीला फलंदाजीला आलेला आर्शिन कुलकर्णी 30 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांसह 43 धावा करून नाबाद राहिला. तसेच आदर्श सिंग 13 धावांवर नाबाद राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com