BCCI's 92nd AGM in Goa Dainik Gomantak
क्रीडा

BCCI Meet in Goa: ‘बीसीसीआय’च्या महसुलात प्रचंड वाढ; 92वी वार्षिक आमसभा

किशोर पेटकर

BCCI AGM 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सध्याच्या आर्थिक वर्षातील महसुलात २१९८.२३ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती सोमवारी आमसभेत देण्यात आली.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नियमन परिषदेवर अरुण धुमल व अविषेक दालमिया यांची बिनविरोध फेरनिवड झाली, तर माजी कसोटीपटू प्रज्ञान ओझा भारतीय क्रिकेटपटू संघटनेचा (आयसीए) प्रतिनिधी या नात्याने परिषदेतून पायउतार झाला.

‘बीसीसीआय’ची ९२वी वार्षिक आमसभा सोमवारी उत्तर गोव्यातील वागातोर येथे झाली. आमसभेला प्रज्ञान ओझा याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली.

ओझा याच्या जागी लवकरच आयसीए प्रतिनिधी नियुक्त केला जाईल. प्राप्त माहितीनुसार, ओझा याने वैयक्तिक कारणास्तव पद सोडत असल्याचे कळविले आहे.

आमसभेत महिला प्रीमियर लीगसाठी (डब्ल्यूपीएल) वेगळी परिषद नियुक्त करण्याचा मात्र निर्णय झाला नाही.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या राज्याकडून ‘पाहुणा’ (व्यावसायिक) क्रिकेटपटू या नात्याने खेळणाऱ्या खेळाडूस अतिरिक्त मोबदला घेता येणार नाही. यासंबंधी निर्णय बीसीसीआय आमसभेत झाला.

या खेळाडूंना करार करणारी राज्य क्रिकेट संघटना अतिरिक्त मोबदला आता देणार नाही. प्रत्येक राज्य संघटना मोसमासाठी तिघा ‘पाहुण्या’ क्रिकेटपटूंना करारबद्ध करू शकते.

बीसीसीआयच्या आमसभेत झालेल्या निर्णयानुसार, या व्यावसायिक खेळाडूंना इतर प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंइतकीच प्रमाणित सामना शुल्क मिळेल. हा नियम आगामी मोसमात लागू होईल.

बीसीसीआय आमसभेने लोकपाल व नैतिकता अधिकारी निवृत्त न्यायमूर्ती विनीत सरन यांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेतला.

बीसीसीआय मिळाला ६,५५८ कोटींचा महसूल

माहितीनुसार, बीसीसीआय आमसभेत खजिनदार आशिष शेलार यांनी सध्याच्या आर्थिक वर्षात मंडळाने ६,५५८.८० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याची माहिती दिली.

२०२१-२२ आर्थिक वर्षात बीसीसीआयचा महसूल ४,३६०.५७ कोटी रुपये इतका होता. क्रिकेट प्रशासन चालविण्यासाठी बीसीसीआयकडून ईशान्य भागातील क्रिकेट संघटनांना प्रतिवर्षी १२.५ कोटी रुपये, तर पुदुचेरीला १७.५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णयही आमसभेत झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT