BCCI Meet in Goa: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी बीसीसीआय करणार सहकार्य

GCA ला बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी व सचिव जय शाह यांचे आश्वासन
BCCI Meet in Goa
BCCI Meet in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI Meet in Goa: गोवा क्रिकेट संघटनेपाशी (जीसीए) स्वतःच्या मालकीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असावे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) स्पष्ट मत आहे. त्यादृष्टीने बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी व सचिव जय शाह यांनी सोमवारी जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी संबंधी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

BCCI Meet in Goa
Shreyas Iyer: 'शतक त्यांच्यासाठी जे...', ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'मॅन ऑफ द मॅच' जिंकलेल्या अय्यरची पोस्ट व्हायरल

बीसीसीआयची 92वी आमसभा सोमवारी बार्देश तालुक्यातील वागातोर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. त्यावेळी जीसीए सचिव रोहन यांनी बीसीसीआयचे क्रिकेट स्टेडियमप्रश्नी लक्ष वेधले. बीसीसीआय क्रिकेट स्टेडियमसाठी जीसीएला पूर्ण सहकार्य करेल.

जीसीए पदाधिकाऱ्यांनी याबाबत बीसीसीआयकडे सातत्याने पाठपुरावा करावा, त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल. गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणे ही काळाची गरज आहे, असे रॉजर बिन्नी यांनी आमसभेनंतर पत्रकारांना सांगितले.

स्वतःच्या मालकीचे स्टेडियम नसल्याने २०१० नंतर गोव्याला बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे यजमानपद बहाल केलेले नाही. आमसभेनंतर रोहन यांनी सांगितले, क्रिकेट स्टेडियमसंदर्भात माझी बीसीसीआय अध्यक्ष व सचिव यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. जय शाह यांनी पूर्ण सकारात्मक दृष्टिकोन अवलंबत गोव्याला पूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली. डिचोली तालुक्यातील जीसीए मालकीच्या क्रिकेट स्टेडियमच्या जागेसंदर्भात सखोल कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल, असेही रोहन यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com