Bangladesh Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs ENG: बांगलादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! सलग दुसऱ्या टी20 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन्स पराभूत

बांगलादेशने इंग्लंडला टी20 मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला आहे.

Pranali Kodre

Bangladesh vs England: ढाकामध्ये बांगलादेश विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. हा सामना यजमान बांगलादेशने 4 विकेट्सने आणि 7 चेंडू राखून जिंकला. याबरोबरच तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेतील 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अशी घटना झाली नव्हती. बांगलादेशने गुरुवारी (9 मार्च) पहिला टी20 सामना 6 विकेट्सने जिंकला होता.

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशसमोर 118 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी त्यांचे सलामीवीर लिटन दास (9) आणि रोणू तलुकदार (9) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या.

पण नंतर नजमुल हुसेन शांतोने आधी तावहिद हृदोयला (17) आणि मग मेहदी हसन मिराज (20) यांना साथीला घेत विजयाकडे आगेकुच केली. पण तरी इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत त्यांना गती घेऊन दिली नव्हती.

हृदोय आणि मेहदी हसन बाद झाल्यानंतर बांगलादेशने कर्णधार शाकिब अल हसन (0) आणि अफिफ हुसेन (2) यांच्या विकेटही झटपट गमावल्या. पण तस्किन अहमदने नजमुलला अखेरीस साथ दिली.

अखेरच्या 13 चेंडूत 13 धावा हव्या असताना तस्किन फलंदाजीला आला. त्यावेळी नजमुल फलंदाजी करत होता. 19 व्या षटकात नजमुलने पहिल्या तीन चेंडूंवर 7 धावा काढल्या. त्यानंतर तस्किनने सलग दोन चौकार ठोकत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशने 18.5 षटकात 6 बाद 120 धावा केल्या. नजमुल 46 धावांवर नाबाद राहिला, तर तस्किन 8 धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 13 धावाच देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच सॅम करन, मोईन अली आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला बांगलादेशी गोलंदाजांनी योग्य ठरवले. तस्किन अहमदने तिसऱ्याच षटकात डेव्हिड मलानला बाद करत पहिला धक्का दिला होता. त्यानंतरही इंग्लंड संघ सावरू शकला नाही. त्यांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

इंग्लंकडून फिलिप सॉल्सटने 25 आणि बेन डकेटने 28 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडकडून एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे इंग्लंडने 20 षटकात सर्वबाद 117 धावा केल्या.

बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 12 धावा धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमद, मुस्तफिजूर रेहमान, शाकिब अल हसन, हसन मेहमूद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तसेच इंग्लंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.

आता या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून बांगलादेशला इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. तर इंग्लंड प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT