INDW vs BANW Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs BANW, T20I: टीम इंडियाने गमावली व्हाईटवॉशची संधी! अखेरच्या सामन्यात बांगलादेशची बाजी; हरमनची झुंज व्यर्थ

INDW vs BANW, T20I: तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाला बांगलादेशविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने व्हाईटवॉश देण्याची संधी हुकली.

Pranali Kodre

Bangladesh Women vs India Women, 3rd T20I : भारतीय महिला संघ विरुद्ध बांगलादेश महिला संघात गुरुवारी टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी२० सामना पार पडला.ढाकाला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण पहिले दोन सामने जिंकले असल्याने भारताने 2-1 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.

या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी 103 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशने 18.2 षटकातच 6 विकेट्स गमावत पूर्ण केले.

बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. बांगलादेशने 16 धावात 2 विकेट्स गमावले होते. पण नंतर शमिमा सुलताना आणि कर्णधार निगर सुलताना यांनी डाव सावरला. मात्र बांगलादेशने 60 धावा पार केल्यानंतर निगर 14 धावांवर बाद झाली. पाठोपाठ शोरना अक्तरही 2 धावांवर बाद झाली.

त्यानंतर सुलताना खातुनने शमिमाला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र 85 धावांवर दोघीही लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्या. सुलताना खातुनला 12 धावांवर देविका वैद्यने बाद केले. तर शमिमा 42 धावांवर धावबाद झाली.

यानंतर मात्र रितू मोनी आणि नाहिदा अक्तर यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही आणि त्यांनी बांगलादेशचा विजय निश्चित केला. मोनीने नाबाद 7 धावा केल्या, तर नाहिदा १० धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून मिन्नू मणी आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जेमिमा रोड्रिग्सने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतानेही स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण त्यानंतर जेमिमा रोड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीतने डाव सांभाळला.

मात्र खेळपट्टीवर स्थिरावली असतानाच जेमिमा 28 धावांवर बाद झाली. त्यामुळे तिची हरमनप्रीतबरोबर झालेली 42 धावांची भागीदारीही तुटली. पण नंतर यास्तिकाने हरमनप्रीतला साथ दिली. मात्र हरमनप्रीत 41 चेंडूच 40 धावांवर असताना बाद झाली. त्यांचीही 31 धावांची भागीदारी झाली होती.

यानंतर मात्र यास्तिकाही 12 धावांवर बाद झाली. तसेच भारताने हरमनप्रीतची विकेट गमावल्यानंतर 11 धावांत पुढील 5 विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताला 20 षटकात 9 बाद 102 धावाच करता आल्या.

बांगलादेशकडून राबेया खानने 3 विकेट्स घेतल्या, तसेच सुलताना खातुनने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नाहिदा अक्तर, फाहिमा खातुन आणि शोरना अक्तर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT