VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal: स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘दिमागी नक्षल’ (वैचारिक नक्षलवाद) या मुद्द्यावरुन आता देशातील राजकारण चांगलेच तापले.
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dainik Gomantak
Published on
Updated on

Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal: स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘दिमागी नक्षल’ (वैचारिक नक्षलवाद) या मुद्द्यावरुन आता देशातील राजकारण चांगलेच तापले. भाजपचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेसवर अत्यंत घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोणाचेही नाव घेतले नव्हते, परंतु गेल्या 24 तासांत ज्यांच्या डोक्यात नक्षलवादी विचार आहेत, ते स्वतःहून समोर आले, असा दावा त्रिवेदी यांनी केला.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वतःला 'दिमागी नक्षल' म्हणवून घेत त्याचा अभिमान बाळगल्याने भाजपने आश्चर्य व्यक्त करत त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. त्रिवेदी यांनी काँग्रेसला (Congress) त्यांच्याच राजवटीची आठवण करुन देत स्पष्ट केले की, चिदंबरम यांच्या कार्यकाळात 5 हजारांहून अधिक निर्दोष नागरिकांचा बळी गेला आणि काँग्रेसच्या काळात देशातील 180 जिल्हे नक्षलवादाने प्रभावित होते. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे नक्षलवादाविरोधात कारवाई करण्यास विवश होते.

Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
PM Modi Independence Day Speech: वर्षभरात 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग; तरुणांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा!

13 एप्रिल 2006 रोजी मनमोहन सिंग यांनी 'नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आजवरचा सर्वात मोठा धोका आहे' असे विधान केले होते. मात्र, आज काँग्रेसचेच माजी गृहमंत्री या धोक्याचे समर्थन करत स्वतःला नक्षलवादी विचारांचे म्हणवून घेत आहेत. त्यामुळे आज काँग्रेसनेच स्पष्ट करावे की, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग योग्य होते की आजचे 'दिमागी नक्षली' पी. चिदंबरम योग्य आहेत?

Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
PM Modi Record: पंतप्रधान मोदींचा 'लकी 10 जून'! इंदिरा गांधींनंतर आता पंडित नेहरुंनाही टाकणार मागे; काय आहे 'तो' अद्भूत रेकॉर्ड?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील नक्षलवाद संपवण्याचे कार्य सिद्ध करुन दाखवले, ज्याची जाणीव मनमोहन सिंग यांनाही होती. पण दुर्दैवाने देशाच्या माजी गृहमंत्र्यांना या यशाचा अभिमान वाटण्याऐवजी नक्षलवादी विचारांचा अभिमान वाटत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पंतप्रधान मोदींनी नक्षलवाद आणि माओवादाने लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचे म्हटले होते.

Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

2014 मध्ये देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला होता आणि आज नक्षलवाद अंतिम घटका मोजत आहे. मात्र, समाजात अजूनही 'दिमागी नक्षल' संधीच्या शोधात असून, अशा विचारसरणीला ओळखणे आणि त्यांच्यापासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com