Agra's Rashi Kanojia T20I Debut for India Women Cricket team Against Bangladesh :
भारतीय महिला संघ आणि बांगलादेश क्रिकेट संघात गुरुवारी टी20 मालिकेतील तिसरा सामना ढाका येथे होत आहे. या सामन्यातून भारतीय महिला संघाकडून राशी कनोजियाचे पदार्पण झाले आहे.
राशीला भारताची दिग्गद अष्टपैलू दिप्ती शर्माकडून आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पणाची कॅप प्रदान करण्यात आली. त्यामुळे ती भारतीय महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी ती ७६ वी खेळाडू ठरली आहे.
25 वर्षीय राशी मुळची उत्तर प्रदेशमधील आग्रामधील आहे. ती डावखुरी फिरकी गोलंदाज आहे. राशी ही मुंबईत रेल्वेमध्ये असिस्टंट क्लर्क म्हणून काम करते. तसेच तिची आई आर्मी शाळेत शिक्षिका आहे, तर वडील आर्मीतून इलेक्ट्रिशियन पदावरून काही वर्षांपू निवृत्त झाले आहेत. तिला मोठा भाऊ देखील आहे.
भारतीय महिला संघाला बांगलादेशविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकून व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. भारताने यापूर्वी पहिला सामना 8 विकेट्स जिंकला होता. तसेच दुसरा रोमांचकरित्या 8 धावांनी जिंकला. त्यामुळे भारताने 3 सामन्यांची टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या संघात काही बदल करण्यात आले आहेत. भारताने प्लेइंग इलेव्हनमधून हर्लिन देओलला बाहेर केले आहे, तसेच देविका वैद्यचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे.
भारत महिला संघ - स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, मिन्नू मणी, राशी कनोजिया
बांगलादेश महिला संघ - शमीमा सुलताना, साथी राणी, दिलारा अक्तर, निगार सुलताना(यष्टीरक्षक/कर्णधार), रितू मोनी, सोरना अक्तर, नाहिदा अक्तर, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अक्तर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.