Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

Upasnagar Sankval Junction Underground Road: महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपुलाचे काम आणि सर्व्हिस रोडमुळे या चौकात अपघाताचा धोका वाढला आहे.
Upasnagar Sankval Junction Underground Road
Upasnagar Sankval JunctionDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: उपासनगर-सांकवाळ चौकात भुयारी मार्ग उभारण्याचे दिलेले आश्वासन लवकर पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा उपासनगर व सांकवाळ परिसरातील रहिवाशांनी दिला.

महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपुलाचे काम आणि सर्व्हिस रोडमुळे या चौकात अपघाताचा धोका वाढला आहे. त्‍यामुळे भविष्यात हा चौक ‘मृत्यूचा सापळा’ ठरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून भुयारी रस्त्याची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Upasnagar Sankval Junction Underground Road
Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

वेर्णाकडे जाणारी व वेर्णाहून येणारी तसेच सांकवाळ गावात ये-जा करणारी वाहने या चौकातून जातात. पूर्वी चौकातून येणारी-जाणारी वाहने स्पष्टपणे दिसत असल्याने वाहनचालक खबरदारी घेत होते. मात्र, आता उड्डाणपूल, सर्व्हिस रोड आणि महामार्ग रुंदीकरणामुळे वाहतुकीची रचना बदलली असून अपघाताचा धोका वाढला आहे.

मंत्री दिगंबर कामत व आमदार आंतोन वाझ यांनी संबंधित एमव्हीआर कंपनीचे अधिकारी, कंत्राटदार आणि रहिवाशांसमवेत या ठिकाणाची पाहणी करून भुयारी रस्ता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामात भुयारी रस्त्याचा कोणताही आराखडा दिसून येत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांकवाळचे उपसरपंच तुळशीदास नाईक, माजी सरपंच नारायण नाईक, रमाकांत बोरकर, अच्‍च्युत नाईक, सामाजिक कार्यकर्ते दीपक गावकर यांच्यासह परिसरातील रहिवासी चौकात एकत्र आले होते.

दरम्‍यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्‍पना देण्‍यासाठी रहिवाशांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्‍यात आला.

Upasnagar Sankval Junction Underground Road
Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

‘आम्हाला गृहीत धरू नका’

महामार्ग रुंदीकरण आणि उड्डाणपुलामुळे चौकातील वाहतुकीची स्थिती गंभीर होणार आहे. भुयारी मार्ग किंवा सुरक्षित पर्यायी व्यवस्था न केल्यास भविष्यात मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे रहिवाशांना गृहीत धरू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला.

उतरणीवरून वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे धोका

रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या उतरणीवरून वाहने वेगाने चौकात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांकवाळकडे जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी भुयारी रस्ता किंवा सुरक्षित पर्यायी मार्गाची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली.

Upasnagar Sankval Junction Underground Road
Goa Tourism: पर्यटकांची गोव्‍यालाच पसंती! जानेवारी ते जुलैदरम्यान तब्बल 61 लाखांहून अधिक पर्यटकांची भेट

प्रमुख मागण्या कोणत्‍या?

भुयारी मार्गासह मूलभूत सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात, उपासनगर-सांकवाळ चौकात भुयारी रस्ता उभारावा, कलाभवनात सांकवाळमधील कलाकार व घुमटवादन शिकणाऱ्यांसाठी दालन उपलब्ध करून द्यावे, कलाभवन परिसरात महिला मंडळांना स्टॉल्‍स उभारण्यास परवानगी द्यावी, सांकवाळ स्मशानभूमीसाठी कोमुनिदादने सुमारे ५०० चौ. मी. जागा उपलब्ध करून द्यावी, गावात प्राथमिक आरोग्य केंद्र स्‍थापन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com