Bangladesh Team Dainik Gomantak
क्रीडा

Bangladesh vs Ireland: बांगलादेशने अवघ्या 79 चेंडूत जिंकला वनडे सामना, मोडले 2 मोठे रेकॉर्ड

Bangladesh vs Ireland: सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 28.1 षटकात 101 धावा केल्या, प्रत्युत्तरात बांगलादेशी संघाने हे लक्ष्य अवघ्या 79 चेंडूत पूर्ण केले.

Manish Jadhav

Bangladesh vs Ireland: बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत आयर्लंडचा एकतर्फी पराभव केला. सिल्हेटमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत बांगलादेशने 10 विकेट्सने विजय मिळवला आणि यासह वनडे मालिका 2-0 ने जिंकली.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 28.1 षटकात 101 धावा केल्या, प्रत्युत्तरात बांगलादेशी संघाने हे लक्ष्य अवघ्या 79 चेंडूत पूर्ण केले.

दरम्यान, बांगलादेशच्या (Bangladesh) विजयात लिटन दास, तमिम इक्बाल यांनी महत्त्वाचे योगदान दिले. लिटनने 38 चेंडूत 50 धावा केल्या तर तमिमने 41 धावांची खेळी खेळली. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी आयरिश फलंदाजी उद्ध्वस्त केली. हसन महमूदने पाच बळी घेतले. तस्किन अहमदला 2 बळी मिळाले. इबादत हुसेनने 2 बळी घेतले.

बांगलादेशने दोन मोठे विक्रम केले

या विजयासह बांगलादेशने मोठा विक्रम केला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा हा सर्वात मोठा विजय आहे. या मालिकेत बांगलादेशने धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात बांगलादेशने आयर्लंडचा 183 धावांनी पराभव केला होता.

वेगवान गोलंदाजांचा विक्रम

बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी आयर्लंडच्या 10 विकेट्स घेतल्या. बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात वेगवान गोलंदाजांनी वनडेमध्ये 10 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मालिका विजयाचा हिरो ठरला मुशफिकुर

बांगलादेशचा यष्टिरक्षक मुशफिकुर रहीमची मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. रहिमने 2 डावात 144 धावा केल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रहिमने अवघ्या 60 चेंडूत 100 धावा केल्या. रहीम बांगलादेशसाठी सर्वात जलद वनडे शतक करणारा खेळाडू ठरला. तसेच, आयर्लंडचा वेगवान गोलंदाज ग्रॅहम ह्यूमने 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या.

आता T20 मध्ये स्पर्धा होणार आहे

वनडे मालिकेनंतर बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात टी-20 फॉर्मेटमध्ये सामना होणार आहे. ही मालिका 27 मार्चपासून सुरु होणार आहे. दुसरा T20 29 मार्चला आणि तिसरा T20 31 मार्चला खेळवला जाईल. सर्व सामने चट्टोग्राम येथे होणार आहेत. या दौऱ्याचा शेवट एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. हा सामना 4 एप्रिलपासून ढाका (Dhaka) येथे खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT