Mining Protest: खनिज वाहतुकीचा मार्ग खडतरच! पिळगाववासीय आक्रमक, गुरुवारपर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन

Vedanta Ore Transportation Goa: खनिज वाहतुकी विरोधातील पिळगावच्या आंदोलनप्रश्नी परिस्थिती अद्याप ‘जैसे थे’ आहे.
Vedanta Ore Transportation Goa
Mining ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: खनिज वाहतुकी विरोधातील पिळगावच्या आंदोलनप्रश्नी परिस्थिती अद्याप ‘जैसे थे’ आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज डिचोलीत झालेल्या संयुक्त बैठकीत शेवटपर्यंत सुवर्णमध्य निघाला नाही. या आंदोलनप्रश्नी निर्णय आता वरिष्ठांवर अवलंबून आहे.

दुसऱ्या बाजूने ट्रकमालकांच्या विनंतीवरून दोन दिवसांपासून अडकून पडलेले आणि खनिज मालाने भरलेले ट्रक जेटीपर्यंत सोडण्यास मात्र बैठकीत मान्यता देण्यात आली. हा अपवाद सोडल्यास मागील दोन दिवसांप्रमाणे आजही पिळगावात ''वेदान्ता''ची खनिज वाहतूक ठप्प राहिली. पिळगाव येथील आंदोलनप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात एक संयुक्त बैठक झाली.

Vedanta Ore Transportation Goa
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

उपजिल्हाधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे उद्या (गुरुवारी) सकाळपर्यंत खाणप्रश्नी तोडगा निघाला नाही, तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा लोकांनी दिला. धूळ प्रदूषण आणि खाणीवरील अंदाधुंद कारभाराला कंटाळलेले पिळगाववासी आक्रमक बनले आहेत. खाण क्षेत्रात येणाऱ्या घरांबाबत चुकीचा अहवाल केल्याचा या लोकांचा आरोप आहे.

पिळगावातील आंदोलनप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली होती. उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस खाण आणि भूगर्भ, आरोग्य, पोलिस आदी संबंधित खात्यांचे अधिकारी तसेच डिचोली ट्रकमालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ग्रामस्थ आक्रमक

उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी समाज कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, पिळगावचे माजी सरपंच महेश वळवईकर, विद्यमान पंचसदस्य मोहिनी जल्मी, मेघनाथ परब गावकर, मंजूषा वळवईकर, अनिल सालेलकर आदी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी कुट्टीकर यांच्यासमोर मुद्दे मांडले. ''ईसी''त नमूद केलेल्या अटींचे पालन करूनच खनिज वाहतूक करावी. धूळ प्रदूषणातून आमची मुक्तता करा, अशी मागणी पिळगावच्या आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी या बैठकीत केली.

Vedanta Ore Transportation Goa
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

प्रदूषण नियंत्रण मंडळाची पाठ

उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळवूनही आजच्या बैठकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधींनी पाठ फिरविली होती. आजच्या बैठकीसाठी प्रदूषण मंडळाचा एकही प्रतिनिधी हजर राहिला नव्हता. त्यामुळे बैठकीस उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबाबत शंका घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.