Construction Rules Change: गोव्यात 300 चौ. मी.च्या भूखंडांनाही वाढीव एफएआर, उंचीची मुभा; बांधकाम नियमांत मोठा बदल

Goa FAR Rules 2026: बांधकाम क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बांधकाम नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
Goa FAR Rules 2026
Construction Rules ChangeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: बांधकाम क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बांधकाम नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ३०० चौरस मीटर आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडांवर अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएआर) आणि इमारतीची अतिरिक्त उंची मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे नगरपालिका, नियोजन क्षेत्र तसेच गावांमधील बांधकामांना वाढीव एफएआर आणि उंचीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या वाढीव सुविधेसाठी निर्धारित शुल्क आकारले जाणार आहे.

अधिसूचना जारी

नगरनियोजन खात्याने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, गोवा भूविकास आणि इमारत बांधकाम नियम, २०१० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. गोवा भूविकास आणि इमारत बांधकाम (सुधारणा) नियम, २०२६ असे या सुधारणेचे नाव असून, अधिसूचना जारी होताच हे नियम लागू झाले आहेत.

Goa FAR Rules 2026
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

बदल असे...

नव्या नियमानुसार, नगरपालिकांच्या हद्दीतील, नियोजन क्षेत्रातील तसेच गावांमधील ३०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांवरील बांधकामांना अतिरिक्त एफएआर आणि उंची मंजूर करण्याचा अधिकार सरकारला असेल. यापूर्वी तक्त्यातील काही तरतुदी ४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या भूखंडांपुरत्या मर्यादित होत्या. सुधारित अधिसूचनेनुसार, ‘४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ’ हा उल्लेख बदलून ‘कोणतेही क्षेत्रफळ’ असा करण्यात आला. त्याचबरोबर तक्त्याखालील दुसरी टीप वगळण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.