Government Jobs: 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी; मुख्यमंत्र्यांची मंजुरी अनिवार्य

Goa Contract Employees Regularisation: गोवा सरकारने सलग दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी २०२६ चे नवे नियम अधिसूचित केले आहेत.
Goa Contract Employees Regularisation
Government JobsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा सरकारने सलग दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी २०२६ चे नवे नियम अधिसूचित केले आहेत. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत नियमित नियुक्ती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. मात्र, नियुक्ती आदेश जारी करण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘गोवा (करारनामा कर्मचाऱ्यांचे सेवेत नियमितीकरण) नियम, २०२६’ हे नियम ३ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत. नियमांच्या अंमलबजावणीच्या तारखेपर्यंत संबंधित पदावर सलग दहा वर्षे सेवा पूर्ण केलेले कर्मचारी या तरतुदींच्या कक्षेत येणार आहेत. कार्मिक विभागाने सर्व सरकारी विभाग, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांना नियुक्ती आदेशासाठी निश्चित नमुन्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक नियमितीकरणाची माहिती कार्मिक विभागाला देणेही आवश्यक आहे.

Goa Contract Employees Regularisation
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

नियमित नियुक्तीनंतर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करावा लागेल. तसेच वैद्यकीय तंदुरुस्ती आणि चारित्र्य व पूर्ववृत्त पडताळणी बंधनकारक असेल. सीसीएस (सुधारित वेतन) नियम, २०१६ नुसार संबंधित पदाच्या वेतन स्तरावर नियुक्ती केली जाईल आणि नियमानुसार लागू भत्ते मिळतील.

१५ वर्षांहून अधिक सेवा केलेल्या ५२ होमगार्डना पोलिस शिपाईपदी पदोन्नती

गोवा सरकारने १५ वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या ५२ होमगार्डना पोलिस शिपाईपदी पदोन्नती दिली आहे. होमगार्डना पोलिसांचा गणवेश परिधान करण्याची संधी देणारा असा उपक्रम राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa Contract Employees Regularisation
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.