India vs Bangladesh: किंग कोहलीचेही शतक; रिकी पाँटिंगला मागे टाकत नोंदवला नवा 'विक्रम'

तीन वर्षानंतर झळकावले शतक; ईशान किशनसोबत विक्रमी भागीदारी
India vs Bangladesh:
India vs Bangladesh:Dainik Gomantak

India vs Bangladesh ODI Series: बांग्लादेशविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान खट्टरने द्विशतक ठोकून लाईमलाईट स्वतःकडे वळवून घेतला असला तरी या सामन्यात विराट कोहलीची बॅट तळपली. किंग कोहलीने या सामन्यात शतकी खेळी साकारली आहे. आणि या शतकासोबतच त्याचा तीन वर्षांचा शतकाचा दुष्काळही मागे सरला आहे. तीन वर्षानंतर कोहलीने शतकी खेळी केली आहे.

India vs Bangladesh:
Ishan Kishan's Double Century: ईशानच्या द्विशतकानंतर विराटने केला भांगडा; व्हिडिओ झाला व्हायरल...

या सीरीजमधील पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठऱलेल्या विराटने चितगाव येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात मात्र खणखणीत शतक ठोकले. सुरवातीला त्याने ईशान किशनसोबत भागीदारीवर लक्ष केंद्रित केले. आणि एकदा सेट झाल्यानंतर त्यानेही बांग्लादेशच्या गोलंदाजांची पिसे काढली. विशेष म्हणजे विराटने द्विशतकवीर ईशान किशनसोबत विक्रमी भागीदारी नोंदवली आहे. विराट आणि ईशान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 190 चेंडुत 290 धावांची खेळी साकारली. ही खेळी देखील एक विक्रम आहे.

या खेळीत विराटने 91 चेंडुत 11 चौकार आणि 2 उत्तुंग षटकारांसह 113 धावांची खेळी केली. विराटने 85 चेंडूत शतक पुर्ण केले. हे विराटचे वन डे क्रिकेट कारकिर्दीतील 44 वे शतक आहे. हे विराटचे बांग्लादेशविरूद्धचे चौथे शतक आहे. विशेष म्हणजे, विराटने ही चारही शतके बांग्लादेशच्या भुमीतच झळकावली आहेत. विराटने या पुर्वीची शतकी खेळी म्हणजेच 43 वे शतक ऑगस्ट 2019 मध्ये झळकावले होते.

India vs Bangladesh:
IND vs BAN: बिहारच्या 'या' लालचा बांगलादेशत गदर! द्विशतक झळकावत दिग्गजांच्या यादीत सामील

दरम्यान, या शतकामुळे विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याला मागे टाकले आहे. आता सर्वाधिक शतके झळकाविलेल्या फलंदाजांच्या पंक्तीत विराट दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. या यादीत अव्वल स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 72 वे शतक आहे. पाँटिंगच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतके आहेत. तर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 100 शतके झळकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com