Bangladesh vs Ireland: या' बांगलादेशी फलंदाजाने ठोकले सर्वात जलद वनडे शतक, मोडला अनेक वर्षांचा रेकॉर्ड!

Mushfiqur Rahim: दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकले.
Mushfiqur Rahim
Mushfiqur Rahim Dainik Gomantak

Bangladesh vs Ireland: दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने केवळ 31 चेंडूंचा सामना करत हे शतक झळकावले.

8 वर्षांनंतरही एबीच्या या विक्रमाच्या जवळपास कोणताही खेळाडू पोहोचू शकला नाही. मात्र, बांगलादेशचा अनुभवी स्टार फलंदाज मुशफिकुर रहीमने सोमवारी आपल्या देशासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला.

रहिमने मोठा विक्रम मोडला

मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim) सोमवारी 60 चेंडूत शतक झळकावले, जे बांगलादेशी खेळाडूचे सर्वात जलद शतक आहे. सिल्हटमध्ये आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर रहीमने ऐतिहासिक कामगिरी केली.

त्याने 166.66 च्या स्ट्राईक रेटने 14 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने हा पराक्रम केला. यापूर्वी, 2009 मध्ये बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) 63 चेंडूत ही कामगिरी केली होती.

Mushfiqur Rahim
India vs Bangladesh Test: विजयासाठी भारताला 4 विकेट्स तर बांग्लादेशला 241 धावांची गरज

34व्या षटकात फलंदाजी आली

डावाच्या 34व्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर रहीमचे शतक झाले. यष्टिरक्षक-फलंदाज 100 धावा करुन नाबाद राहिला. यासोबत रहीमने वनडेमध्ये 7 हजार धावाही पूर्ण केल्या.

अशी कामगिरी करणारा तो शाकिब आणि तमिम इक्बालनंतर बांगलादेशचा (Bangladesh) तिसरा फलंदाज ठरला आहे. रहीमच्या नावावर आता 9 वनडे शतके आहेत. बांगलादेशने दोन दिवसांपूर्वी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 338 धावा केल्या.

Mushfiqur Rahim
India vs Bangladesh: बांग्लादेशविरूद्धच्या दोन पराभवांचा भारताने घेतला बदला; 228 धावांनी मात

मोठा विजय मिळाला

बांगलादेशने 183 धावांनी दणदणीत विजय नोंदवला, जो धावांच्या बाबतीत त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. येथे, रहीमचे शानदार शतक, नजमुल हुसेन शान्तोच्या 77 चेंडूत 73 आणि तौहिद हृदयॉयच्या 34 चेंडूत 49 धावांच्या बळावर त्यांनी 349/6 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com