Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs ENG ODI: शाकिब अल हसनने रचला इतिहास, ODI क्रिकेटमध्ये...!

Shakib Al Hasan: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने आपल्या कारकिर्दीत एक विशेष कामगिरी केली आहे.

Manish Jadhav

Shakib Al Hasan Record In ODI: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने आपल्या कारकिर्दीत एक विशेष कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा शाकिब बांगलादेशचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

एक प्रकारे शाकिबने बांगलादेश (Bangladesh) क्रिकेटसाठी नवा इतिहास रचला आहे. इतकेच नाही तर शाकिबने आपल्या वनडे कारकिर्दीत फलंदाजी करताना 300 हून अधिक बळी आणि 6000 हून अधिक धावा करणाऱ्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही सामील झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा शाकिब जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

दरम्यान, शाकिबच्या आधी सनथ जयसूर्या आणि शाहिद आफ्रिदीने असा पराक्रम केला आहे. श्रीलंकेच्या जयसूर्याने एकदिवसीय कारकिर्दीत 13430 धावा आणि 323 विकेट घेतल्या आहेत.

पाकिस्तानच्या (Pakistan) शाहिद आफ्रिदीने 8064 धावा आणि 395 विकेट्स घेण्याचा चमत्कार केला आहे. त्याचबरोबर, आता शाकिबने 6976 धावा आणि एकूण 300 विकेट घेतल्या आहेत.

तसेच, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, बांगलादेशने हा सामना 50 धावांनी जिंकण्यात यश मिळवले.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 48.5 षटकांत 246 धावा केल्या होत्या, त्यानंतर इंग्लिश संघ 43.1 षटकांत केवळ 196 धावाच करु शकला.

बांगलादेशच्या शाकिबने वनडे कारकिर्दीतील 52 वे अर्धशतक झळकावले आणि 75 धावा करुन बाद झाला, गोलंदाजी करताना शकीबने 10 षटकात 35 धावा देत 4 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT