Shakib Al Hasan, India vs Bangladesh 2nd Test: बांगलादेशने आपल्याच यजमानपदी भारतीय संघाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका गमावली. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी संघ चालू कसोटी मालिकेतील एकही सामना जिंकू शकला नाही. शाकिबने कसोटी सामन्यानंतर मालिकेतील पराभवाची चर्चा केली. शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमानांनी भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले होते. गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत टीम इंडियाच्या 7 विकेट्सही घेतल्या पण शेवटी भारताचा विजय झाला.
अश्विन आणि अय्यर विजयी झाले
ढाका येथील शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा (Bangladesh) पहिला डाव 227 धावांत गुंडाळला. भारताने पहिल्या डावात 314 धावा केल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या डावात यजमान संघ 231 धावांत आटोपला. टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ते 7 गडी गमावून पूर्ण केले. रविचंद्रन अश्विन (42*) आणि श्रेयस अय्यर (29*) यांनी शानदार कामगिरी केली. 8 व्या विकेटसाठी त्यांनी नाबाद 71 धावांची भागीदारी केली.
याचे कारण शकीबने सांगितले
एकवेळ अशी आली होती की, बांगलादेश हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते पण खराब क्षेत्ररक्षणाचा फटका त्यांना सहन करावा लागला. सामन्यानंतर कर्णधार शाकीब अल हसन म्हणाला की, 'कॅच सोडणे खूप निराशाजनक आहे. इतर संघ ही संधी सोडत नाहीत पण आम्ही ती गमावत आहोत. झेल सोडल्याने सामन्यातील फरक वाढला. आम्ही त्यांना पहिल्या डावात 314 ऐवजी 250 धावांवर सर्वबाद करु शकलो असतो. दुसऱ्या डावात आम्हाला संधी होती, परंतु हा खेळाचा भाग आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.