Babar Azam  Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: बाबर आझमने मोडला मिसबाहचा मोठा रेकॉर्ड, पाकिस्तानसाठी ठरला खास

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 35 वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बंगळुरुमध्ये खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 35 वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बंगळुरुमध्ये खेळला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यात शानदार फलंदाजी करत एक विशेष कामगिरी केली आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात ग्रीन टीमसाठी सर्वाधिक 50 प्लस इनिंग खेळणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. या लिस्टमध्ये पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज जावेद मियांदाद यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येते.

मियांदाद यांनी विश्वचषकात आपल्या संघासाठी नऊ वेळा 50 प्लस इनिंग खेळल्या आहेत. त्यांच्यानंतर बाबर आझम आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मिसबाह उल हकचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सात वेळा 50 प्लस इनिंग खेळल्या आहेत.

दरम्यान, या खेळाडूंनंतर माजी क्रिकेटपटू आमेर सोहेल आणि सईद अन्वर चौथ्या स्थानावर आहेत. या दोन्ही फलंदाजांनी अनुक्रमे सहा वेळा ही खास कामगिरी केली आहे.

विश्वचषकात पाकिस्तानसाठी सर्वाधिक 50+ इनिंग खेळलेले फलंदाज:

9 - जावेद मियांदाद

8 - बाबर आझम (Babar Azam)

7- मिसबाह उल हक

6- आमेर सोहेल

6- सईद अन्वर

दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कर्णधार बाबर आझमने शानदार फलंदाजी केली. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, बाबरने 104.76 च्या स्ट्राइक रेटने 63 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 66 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT