PAK vs NZ: किवींना पाकिस्तानच्या फखर जमानचा शतकी दणका! तब्बल 36 वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

Fakhar Zaman: पाकिस्तानच्या फखर जमानने न्यूझीलंडविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकत 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
Fakhar Zaman
Fakhar ZamanICC
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Pakistan, Fakhar Zaman Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी (4 नोव्हेंबर) सामना होत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 402 धावांचे आव्हान ठेवले होते. पण नंतर पावसाच्या व्यत्ययामुळे 41 षटकात 342 असे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवण्यात आले.

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलामीवीर फखर जमानने शतकी खेळी केली आहे. त्याने 63 चेंडूत 20 व्या षटकात त्याचे शतक पूर्ण केले. त्याने हे शतक पूर्ण करताना 9 षटकार आणि 6 चौकार मारले. मात्र, त्याचे शतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच 22 व्या षटकावेळी पावसाला सुरुवात झाली.

Fakhar Zaman
World Cup 2023: 'ICC, टीम इंडिया आणि वेगळा बॉल!' पाकिस्तानी क्रिकेटरचा हस्यास्पद दावा अन् आकाश चोप्राची फटाकेबाजी

दरम्यान, फखरने 63 चेंडूत शतक केल्याने तो आता पाकिस्तानचा वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने सलीम मलिकचा 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. सलीम मलिकने 1987 सालच्या वर्ल्डकपमध्ये फैसलाबाद येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात 94 चेंडूत शतक केले होते.

तसेच फखरने पाकिस्तानकडून वनडे वर्ल्डकपमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा कारनामाही केला आहे. त्याने इम्रान नाझीरचा 2007 वर्ल्डकपमध्ये केलेला विक्रम मोडला आहे.

Fakhar Zaman
World Cup 2023: हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियात 'या' बॉलरची वर्णी

नाझीरने झिम्बाब्वे विरुद्ध किंग्स्टन येथे 121 चेंडूत 160 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 8 षटकार मारले होते. हे शतक नाझीरने 95 चेंडूत शतक केले होते. त्यामुळे हे पाकिस्तानकडून वर्ल्डकपमध्ये केलेले तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले आहे.

  • पाकिस्तानकडून सर्वात वेगवान शतक

    • 63 चेंडू - फखर जमान (विरुद्ध न्यूझीलंड, 2023)

    • 94 चेंडू - सलीम मलिक (विरुद्ध श्रीलंका, 1987)

    • 95 चेंडू - इम्रान नाझीर (विरुद्ध झिम्बाब्वे, 2007)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com