PAK vs NZ: फखरच्या फटकेबाजीनंतर पावसाची कृपा अन् पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 21 धावांनी विजय

World Cup 2023: न्यूझीलंडने 400 धावा करूनही पाकिस्तानने विजय मिळवल्याने दोन्ही संघांच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.
Babar Azam - Fakhar Zaman
Babar Azam - Fakhar Zaman
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Pakistan:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी (4 नोव्हेंबर) झाला. या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 21 धावांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील चौथा विजय असल्याने त्यांचे आता 8 गुण झाले आहेत. मात्र, न्यूझीलंडचा हा सलग चौथा पराभव झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे देखील 8 गुण आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीच्या आशा जिवंत आहेत. पण आता त्यांना साखळी फेरीतील त्यांचे आपापले अखेरचे सामने जिंकणे आवश्यकच आहे.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 402 धावांचे आव्हान ठेवले होते. पण नंतर पावसाच्या व्यत्ययामुळे 41 षटकात 342 असे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवण्यात आले.

मात्र पाकिस्तानने 25.3 षटकात 1 बाद 200 धावा केलेल्या असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला आणि अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आले.

Babar Azam - Fakhar Zaman
PAK vs NZ: किवींना पाकिस्तानच्या फखर जमानचा शतकी दणका! तब्बल 36 वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून फखर जमान आणि अब्दुल्ला शफिक यांनी सलामीला फलंदाजी केली होती. पण टीम साऊथीने दुसऱ्याच षटकात अब्दुल्ला शफिकला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर फखर जमान आणि कर्णधार बाबर आझम यांची जोडी जमली. या दोघांनीही आक्रमक खेळ केला.

दरम्यान, फखरने 63 चेंडूतच शतक पूर्ण केले. त्याच्या शतकानंतर काही वेळासाठी पावसामुळे सामना थांबला होता. त्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला. यानंतर बाबरने अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि सामना थांबवण्यात आला.

हा सामना थांबला तेव्हा फखरने 81 चेंडूत 8 चौकार 11 षटकारांसह नाबाद 126 धावा केल्या होत्या. तसेच बाबर आझमने 63 चेंडूत 6 चौकार 2 षटकारांसह नाबाद 66 धावांची खेळी केली.

Babar Azam - Fakhar Zaman
World Cup 2023: हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियात 'या' बॉलरची वर्णी

तत्पुर्वी, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि रचिन रविंद्र यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, त्यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली असतानाच कॉनवेला हसन अलीने 35 धावांवर बाद केले.

मात्र, त्यानंतर रचिन रविंद्र आणि कर्णधार केन विलियम्सन यांची जोडी जमली. या दोघांनीही शानदार खेळ करत दीड शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रचिनने शतकही पूर्ण केले. मात्र, केन विलियम्सन शतकाच्या अगदी जवळ असताना त्याला 35 व्या षटकात इफ्तिखार अहमदने त्याला बाद केले. विलियम्सनने 79 चेंडूत 95 धावांची खेळी केली.

त्याच्यापाठोपाठ लगेचच 36 व्या षटकात रचिनलाही मोहम्मद वासिम ज्युनियरने बाद केले. रचिनने 94 चेंडूत 108 धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर डॅरिल मिचेल (29), मार्क चॅपमन (39), ग्लेन फिलिप्स (41) यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. तसेच मिचेल सँटेनरने नाबाद 26 धावांची खेळी केली. टॉम लॅथमने नाबाद 2 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने 50 षटकात 6 बाद 401 धावा केल्या.

पाकिस्तानकडून मोहम्मद वासिम ज्यूनियरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com