Babar Azam & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Babar Azam Angry on Virat Kohli Comparison: क्रिकेट जगतात किंग विराट कोहली आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यांची तुलना वेळोवेळी केली जाते.

Manish Jadhav

Babar Azam Angry on Virat Kohli Comparison: क्रिकेट जगतात किंग विराट कोहली आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यांची तुलना वेळोवेळी केली जाते. विराट कोहलीने टी-20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केले असले, तरी त्याची महानता आजही अबाधित आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये बाबरला कोहलीच्या तोडीचा खेळाडू मानले जाते. मात्र, नुकत्याच झालेल्या एका घटनेने बाबर आझमच्या रागाचा थरार पाहायला मिळाला. कोहलीचे नाव काढताच बाबर आझम भर पत्रकार परिषदेत पत्रकारावर भडकला आणि त्याने ही तुलना थांबवण्याचा इशारा दिला.

सध्या पाकिस्तानमध्ये 'पाकिस्तान सुपर लीग'चा थरार सुरु आहे. या स्पर्धेत बाबर आझम पेशावर जाल्मी संघाचे नेतृत्व करत आहे. बुधवारी पेशावर आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एक वेगळाच नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने विजयासाठी केवळ 145 धावांचे साधे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान पेलताना बाबर आझमच्या (Babar Azam) पेशावर संघाला घाम फुटला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पेशावरने कसाबसा विजय मिळवला.

कर्णधार म्हणून बाबर आझम स्वतः सलामीला फलंदाजीसाठी आला होता. त्याने 37 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने एकही षटकार मारला नाही, तर केवळ चार चौकार ठोकले. जेव्हा लक्ष केवळ 145 धावांचे होते, तेव्हा बाबरने सामना संपवून येणे अपेक्षित होते. मात्र, 15व्या षटकात 116 धावांवर बाबर बाद झाला. सामना अर्धवट सोडून आल्यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने थेट विराट कोहलीचा संदर्भ देत बाबरला खिंडीत गाठले. पत्रकार म्हणाला, "विराट कोहली सुद्धा तुमच्यासारखेच शॉट्स खेळतो, पण तो नेहमी सामना फिनिश करुन परततो, जे तुम्हाला जमले नाही. लोक तुमची तुलना त्याच्याशी करतात, यावर तुमचे काय मत आहे?" हा प्रश्न ऐकताच बाबर आझमचा चेहरा लाल झाला. तो रागात म्हणाला, "हे विचार तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा. ही तुलना करणे बंद करा आणि पुढे चला. मी सामने फिनिश करत नाही, ही तुमची चुकीची समजूत आहे. मी नेहमी सामना संपवण्याचा प्रयत्न करतो आणि अनेकदा ते केलेही आहे."

वास्तविक पाहता, पत्रकाराने केलेली तुलना तांत्रिकदृष्ट्या चुकीची होती. कोहली बाबरसारखा खेळत नाही, तर बाबर कोहलीची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, ज्यात तो अनेकदा अपयशी ठरतो. विशेषतः स्ट्राइक रेट आणि सामना संपवण्याच्या क्षमतेवरुन बाबर नेहमीच टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. बाबरचा हा रागीट अवतार सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. कोहलीचे नाव ऐकताच पाकिस्तानी कर्णधाराची झालेली फजिती पाहून क्रिकेट चाहते या व्हिडिओचा आनंद घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT