David Warner Dainik Gomantak
क्रीडा

David Warner on Retirement: वॉर्नरने निवृत्तीबद्दल केली मोठी घोषणा! 'ही' कसोटी मॅच ठरणार शेवटची

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटीतून निवृत्तीबद्दल मोठी घोषणा केली आहे.

Pranali Kodre

David Warner on Test Retirement: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने नुकतेच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पुढीलवर्षी जानेवारीमध्ये कसोटी कारकिर्द संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाला डिसेंबर 2023 - जानेवारी 2024 दरम्यान पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत वॉर्नर कसोटी जर्सीत अखेरचा दिसण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी बेकनहॅम येथे पत्रकारांशी बोलताना वॉर्नरने सांगितले आहे की त्याला आशा आहे की तो जानेवारीमध्ये सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळून त्याची कसोटी कारकिर्द संपवू शकेल.

36 वर्षीय वॉर्नर पुढीलवर्षी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. पण असे असले तरी 2024 टी20 वर्ल्डकपपर्यंत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

वॉर्नरने शनिवारी (3 जून) सांगितले की 'तुम्हाला धावा काढाव्या लागतील. मी यापूर्वीही सांगितले आहे. 2024 वर्ल्डकपमध्ये कदाचीत माझ्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल. मी माझा आणि माझ्या कुटुंबाचा ऋणी आहे.'

'जर मी येथे (कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना आणि ऍशेस) धावा काढू शकलो आणि परत ऑस्ट्रेलियात जाऊन खेळू शकलो, तर मी नक्कीच वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका खेळणार नाही.'

मी कदाचित ते माझे आणि माझ्या कुटुंबाचे ऋणी आहे - जर मी येथे धावा काढू शकलो आणि ऑस्ट्रेलियात खेळणे सुरू ठेवले तर - मी निश्चितपणे सांगू शकतो की मी वेस्ट इंडिजची ती मालिका खेळणार नाही.'

'जर मी कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना आणि ऍशेस यातून पुढे गेलो आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळलो. तर मला तिथे कसोटी कारकिर्दीचा शेवट करण्यास आनंद होईल.'

दरम्यान, वॉर्नरचा आगामी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि 16 जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश आहे.

वॉर्नरची कसोटी कारकिर्द

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 103 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याने 45.57 सरासरीने 8158 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 25 शतकांचा आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: टीप मिळाली अन् आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश झाला! 1000 कोटींच्या सायबर घोटाळ्याचं 'चीन कनेक्शन'; 4 चिनी नागरिकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल

Viral Video: अक्षय खन्नावर पाकिस्तान फिदा! 'FA9LA' हुकस्टेपचा बलुची पोरांना फीव्हर; फॅनबेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

VIDEO: चालत्या कारला केलं लक्ष्य, बॉम्ब थेट गाडीवर आदळला, 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टरमाईंड 'राद साद' ठार; इस्रायली सैन्याने हवाई हल्ल्यात घेतला बदला

'गोव्यात हफ्ता दिल्याशिवाय धंदा चालत नाही', रोमिओ लेन दुर्घटनेवरून केजरीवालांचा भाजप सरकारवर हल्ला

IND vs SA: अभिषेक शर्मा बनणार टीम इंडियाचा नवा 'रन मशीन'! किंग कोहलीचा 9 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड धोक्यात; कराव्या लागणार 'इतक्या' धावा

SCROLL FOR NEXT