Sania Mirza and Rohan Bopanna  Dainik Gomantak
क्रीडा

Australian Open: ग्रँडस्लॅमचं स्वप्न भंगलं! सानिया मिर्झा - रोहन बोपन्ना फायनलमध्ये पराभूत

सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नाला ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Pranali Kodre

Sania Mirza and Rohan Bopanna: शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील मिश्र दुहेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला ब्राझीलच्या ल्युसा स्टेफानी आणि राफेल मातोस या जोडीने पराभूत करत विजेतेपद जिंकले. त्यामुळे सानिया आणि रोहन यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

रोड लॅवर एरिना येथे झालेल्या अंतिम सामन्यात सानिया - बोपन्ना यांना 6-7 (2-6), 2-6 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. हा सानियाचा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील शेवटचा सामनाही ठरला. मात्र अखेरच्या ग्रँडस्लॅममध्ये विजेतेपद मिळवण्याचे तिचे स्वप्न अधूरे राहिले. त्यामुळे तिची ग्रँडस्लॅम कारकिर्द 6 विजेतेपदांसह संपली.

अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्येच सानिया - बोपन्ना यांनी 0-2 अशा पिछाडीनंतरही 3-2 अशी आघाजी घेतली होती. पण त्यानंतर ब्राझिलियन जोडीने 3-3 अशी बरोबरी साधली. पण यानंतरही सानिया-बोपन्नाने पुन्हा 5-3 अशी आघाडी घेतली.

मात्र, स्टेफानी - मातोस यांची जोडी हार मानण्यास तयार नव्हती. त्यांनी झुंज देत त्यांनी या सेटमध्ये बरोबरी साधली. त्यामुळे पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये स्टेफानी आणि मातोस यांनी बाजी मारली आणि पहिला सेट 7-6 (6-2) असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये स्टेफानी आणि मातोस यांनी एकतर्फी वर्चस्व राखले होते. त्यांनी 4-1 अशी आघाडी सहज घेतली होती. त्यांनतरही सानिया आणि बोपन्ना यांनी संघर्ष करत पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, स्टेफानी आणि मातोस यांनी त्यांना विजयापर्यंत पोहचू दिले नाही आणि सेट 6-2असा सहज जिंकत विजेतेपदावरही नाव कोरले.

दरम्यान, सानियाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धा तिची अखेरची ग्रँडस्लॅम असणार आहे. यानंतर ती तिच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा दुबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात खेळेल.

सानियाने जिंकलेल्या 6 ग्रँडस्लॅम विजेतेपदांमध्ये तीन मिश्र दुहेरीतील आणि तीन महिला दुहेरीतील विजेकेपदांचा समावेश आहे. तिने मिश्र दुहेरीत 2009 मध्येऑस्ट्रेलियन ओपन, 2012 साली फ्रेंच ओपन आणि 2014 साली अमेरिकन ओपन विजेतेपद जिंकले होते.

त्याचबरोबर तिने महिला दुहेरीत 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन, तसेच 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

CBI अधिकारी बनून फसवणूक! बंगळुरुतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला 32 कोटींचा गंडा, मानसिक त्रासाने बिघडली महिलेची तब्येत

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

SCROLL FOR NEXT