Sania - Bopanna फायनलमध्ये, पण लक्ष वेधतायेत त्यांची 'लेकरं'

Pranali Kodre

सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीने 25 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Sania Mirza - Rohan Bopanna | Dainik Gomantak

सानिया आणि रोहन यांनी उपांत्य सामन्यात तिसऱ्या मानांकित डिझायरे क्रावचेक अणि निल स्कुप्स्की या जोडीला पराभूत केले.

Sania Mirza - Rohan Bopanna | Dainik Gomantak

एक तास 52 मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात 7-6(5) 6-7(5) 10-6 अशा फरकाने सानिया आणि रोहन या जोडीने विजय मिळवला आहे.

Sania Mirza - Rohan Bopanna | Dainik Gomantak

दरम्यान, हा उपांत्य सामना संपल्यानंतर सानियाचा मुलगा इझहान आणि रोहनची मुलगी त्रिधा हे कोर्टवर आले होते.

Sania Mirza Son - Rohan Bopanna Daughter | Dainik Gomantak

यावेळी या दोन्ही चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

Sania Mirza Son | Dainik Gomantak

इझहान आणि त्रिधा कोर्टवर आल्यानंतर त्यांना सानिया आणि रोहनने उचलून घेतले होते.

Sania Mirza Son - Rohan Bopanna Daughter | Dainik Gomantak

त्यांचे कोर्टवर आल्यानंतरचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

Sania Mirza Son | Dainik Gomantak

दरम्यान, सानिया आणि रोहन यांना शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील मिश्र दुहेरीचा अंतिम सामना खेळायचा आहे.

Sania Mirza | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन 2023 ही सानियाची कारकिर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.

Sania Mirza | Dainik Gomantak
Andy Murray | Dainik Gomantak