Australia Test Team Dainik Gomantak
क्रीडा

Australia Won WTC 2023 Final: सिराजची विकेट अन् ऑस्ट्रेलिया चॅम्पियन! ICC शेअर केली 'विनिंग मोमेंट'

Video: ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत कसोटी चॅम्पियनशीप विजेतेपदावर शिक्कामोर्तब करतानाचा क्षण पाहा

Pranali Kodre

Australia Winning Moment in WTC 2023 Final: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी भारतीय संघाला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने या विजयासह कसोटीतीलही जगज्जेतेपदावर नाव कोरले आहे.

दरम्यान अंतिम सामन्याचा निकाल अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 280 धावांची आणि ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सची गरज होती. पण यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.

भारताने अखेरच्या दिवशी 57 व्या षटकात दुसऱ्या डावातील सहावी विकेट गमावली होती. त्यानंतर पुढच्या 7 षटकात भारताने उरलेल्या चारही विकेट्स गमावल्या. भारताची अखेरची विकेट ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनने घेतली. त्याने 64 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला चकवले.

सिराजचा झेल स्कॉट बोलंडने बॅकवर्ड पाँइंटला घेतला. यासह भारताचा दुसरा डाव 63.3 षटकात 234 धावांमध्ये संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयी क्षणाचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तसेच शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरीने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅब्युशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या.

भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तसेच अजिंक्य रहाणेने 46 आणि रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणाला फार काही खास करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ, Head to Head Record: भारत-न्यूझीलंड टी-20 सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?

Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

Tourist Safety: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; हॉटेल नोंदणीचे नियम बदलले! आता 'Fire NOC' बंधनकारक

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

SCROLL FOR NEXT