Australia Won World Cup: वर्चस्व म्हणतात ते हेच! ऑस्ट्रेलिया तब्बल 26 व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन, एकदा नजर टाकाच

World Cup 2023: ऑस्ट्रेलिया संघाचे आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व दिसून येत असून त्यांनी वर्ल्डकप 2023 स्पर्धा जिंकत इतिहास रचला.
Australia Team
Australia TeamICC
Published on
Updated on

Australia is world champion for 26th times:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात रविवारी भारताला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकपवर नाव कोरले.

त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हे विजेतेपद ऐतिहासिक ठरले. ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने तब्बल दहाव्यांदा आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया पहिला संघ आहे, ज्यांनी वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप, कसोटी चॅम्पिनयशीप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा चारही स्पर्धांचे विजेतेपद जिंकले आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाच्या पुरुष, महिला आणि युवा संघाने आत्तापर्यंत मिळून तब्बल 26 विश्वविजेतेपद जिंकले आहे.

Australia Team
WTC 2023 Final: भारताचं स्वप्न पुन्हा भंगलं! ऑस्ट्रेलिया नवे टेस्ट चॅम्पियन

ऑस्ट्रेलिया पुरुष संघाची विश्वविजेतीपदं

ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने आयसीसीच्या स्पर्धांपैकी आत्तापर्यंत 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 पाचवेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे, तसेच 2006 आणि 2009 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

तसेच 2021 मध्ये त्यांनी टी20 वर्ल्डकपवरही नाव कोरले होते. याशिवाय आता ऑस्ट्रेलियाने कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपदही मिळवले आहे.

Australia Team
WTC 2023 Final Video: बोलंडचा विराटच्या कमजोरीवर वार अन् स्मिथचा शानदार कॅच, जडेजाही शुन्यावर बाद

ऑस्ट्रेलिया महिला संघाची विश्वविजेतीपदं

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे आयसीसीच्या स्पर्धांपैकी 2010, 2012, 2014, 2018, 2020 आणि 2023 असे 6 वेळा टी20 वर्ल्डकप जिंकले आहेत, तर 1978, 1982, 1988, 1997, 2005,2013 आणि 2022 असे सात वेळा वनडे वर्ल्डकप जिंकले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाची विश्वविजेतीपदं

त्याचबरोबर 1988, 2002 आणि 2010 या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे एकूणच पाहिले, तर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आयसीसी स्पर्धांमध्ये दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com