Sanju Samson: "विराट-रोहितला पाहून मी..." ऐतिहासिक खेळीनंतर संजू सॅमसनने उघड केलं आपल्या यशाचे गुपित!

Sanju Samson Statement on Virat Rohit: वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने आपल्या बॅटने जी फटकेबाजी केली, ती पाहून क्रिकेटप्रेमी थक्क झाले आहेत.
Sanju Samson
Sanju SamsonDainik Gomantak
Published on
Updated on

वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने आपल्या बॅटने जी फटकेबाजी केली, ती पाहून क्रिकेटप्रेमी थक्क झाले आहेत. संजूने केवळ ९७ धावांची खेळी केली नाही, तर भारतीय संघ व्यवस्थापनाला आपल्या प्रतिभेची जाणीव करून दिली आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर संजूने आपल्या यशाचे गुपित उघड करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

मैदानावर संजूचे वादळ

भारतीय संघात अचानक झालेल्या बदलामुळे संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. या संधीचे सोने करत संजूने ५० चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी साकारली. १९४ च्या स्ट्राइक रेटने खेळताना त्याने १२ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. संजूच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वेस्ट इंडीजचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. या खेळीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.

Sanju Samson
Goa History: 1320 च्या दशकात खिलजी सेनापती मलिक काफूरने गोपकपट्टण लुटले; आर्यादुर्गा व गोव्यातील कदंब

विराट आणि रोहितकडून घेतले फिनिशिंगचे धडे

सामन्यानंतर संजू भावूक झाला होता. तो म्हणाला, "मी जरी मैदानावर कमी सामने खेळलो असलो, तरी डगआऊटमध्ये बसून मी खूप काही शिकलो आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे महान खेळाडू डावाचा शेवट कसा करतात, हे मी गेल्या १० वर्षांपासून जवळून पाहत आहे. मी कदाचित ५०-६० सामने खेळलो असेल, पण १०० पेक्षा जास्त सामने मी फक्त निरीक्षणासाठी पाहिले आहेत. त्यांच्याकडून मिळालेले हे धडे आज माझ्या कामी आले."

Sanju Samson
Goa Crime: रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर केला वार, कर्नाटकातील विवाहितेचा मृत्यू; संशयित पतीला 7 दिवसांची कोठडी

संघर्षाचा प्रवास आणि स्वतःवरील विश्वास

आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारांबद्दल बोलताना संजूने सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा तो स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागला होता. "देशासाठी खेळण्याचे स्वप्न मी लहानपणापासून पाहिले होते. अनेक वेळा अपयश आले, मनात शंका निर्माण झाल्या, पण मी देवावर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास कायम ठेवला. आजची ही खेळी म्हणजे माझ्या त्या संयमाचे फळ आहे," असे संजूने नमूद केले.

परिस्थितीनुसार बदलली रणनीती

मागच्या सामन्यात संजू पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण या सामन्यात त्याने वेगळी रणनीती अवलंबली. तो म्हणाला, "ज्यावेळी मी वेगाने खेळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा आम्ही विकेट्स गमावत होतो. त्यामुळे मी भागीदारी करण्यावर आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले. एका वेळी एक चेंडू खेळण्याचे माझे ध्येय होते. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com