Australia
AustraliaDainik Gomantak

WTC 2023 Final: विजेता ऑस्ट्रेलिया मालामाल! ICC कडून भारतासह 'या' 9 संघांनाही कोट्यवधींची बक्षीसं

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 मध्ये विजेते-उपविजेते ठरलेल्या ऑस्ट्रेलिया-भारतासह 9 संघांना आयसीसीकडून कोट्यवधींचे बक्षीस मिळणार आहे.
Published on

WTC 2021-23 Prize Money: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने रविवारी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. ऑस्ट्रेलियाने द ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला 209 धावांनी पराभूत करत कसोटी विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

ऑस्ट्रेलियाचे हे कसोटीतील पहिले विश्वविजेतेपद ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिला पुरुष संघ ठरला आहे, ज्यांनी वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप, कसोटी चॅम्पिनयशीप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा चारही स्पर्धांचे विजेतेपद जिंकले आहे.

Australia
Australia Won World Cup: वर्चस्व म्हणतात ते हेच! ऑस्ट्रेलिया तब्बल 26 व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन, एकदा नजर टाकाच

आयसीसीकडून बक्षीस

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यापूर्वीच कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेसाठीच्या बक्षीस रकमांची घोषणा केली होती. त्यानुसार स्पर्धेतील सहभागी 9 संघांमध्ये 3.8 मिलियन डॉलर (भारतीय चलनानुसार जवळपास 13.2 कोटी रुपये) बक्षीस रक्कम वाटून देण्यात आली.

विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला 1.6 मिलियन डॉलर (भारतीय चलनानुसार जवळपास 31.4 कोटी रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच उपविजेता ठरलेल्या भारतीय संघाला 800,000 डॉलर (भारतीय चलनानुसार जवळपास 6.5 कोटी रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले.

Australia
Shubman Gill Catch Controversy: आऊट की नॉटआऊट, ग्रीनने घेतलेल्या गिलच्या कॅचवर चर्चेला उधाण, पण ICC म्हणतेय...

याशिवाय या स्पर्धेत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला 450,000 डॉलर (भारतीय चलनानुसार जवळपास 3.72 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच चौथ्या क्रमांकावरील इंग्लंडला 350,000 डॉलर (भारतीय चलनानुसार जवळपास 2.89 कोटी रुपये) बक्षीस म्हणून मिळतील.

याशिवाय श्रीलंका संघाला 200,000 डॉलर (भारतीय चलनानुसार जवळपास 1.65 कोटी रुपये) बक्षीस म्हणून मिळतील. श्रीलंका गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिले होते.

तसेच न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना प्रत्येकी 100,000 डॉलर बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या स्पर्धेच्या पहिल्या पर्वासाठीही (2019-21) 3.8 मिलियन डॉलर एवढीच बक्षीस रक्कम होती.

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजय

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला दुसऱ्या डावात 63.3 षटकात सर्वबाद 234 धावा करता आल्या. यामुळे भारताचे पुन्हा एकदा कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले.

यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीप 2019-21 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com