Mitch Marsh - Steve Smith | Australia
Mitch Marsh - Steve Smith | Australia 
क्रीडा

World Cup 2023: मार्शचं वादळी दीडशतक! ऑस्ट्रेलियाचा सलग सातवा विजय, तर बांगलादेशचा शेवट पराभवाने

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs Bangladesh:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी (11 नोव्हेंबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 43 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाचा हा स्पर्धेतील सलग सातवा विजय आहे. त्यामुळे आता सलग सात विजयांसह ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 नोव्हेंबर रोजी उपांत्य सामना खेळणार आहे.

तसेच बांगलादेशचे आव्हान मात्र, यापूर्वीच संपले होते. पण त्यांना हा सामना जिंकून शेवट गोड करण्याची संधी होती. मात्र, वर्ल्डकप 2023 स्पर्धेत त्यांच्या मोहिमेचा शेवटही पराभवाने झाला आहे. बांगलादेशने 9 सामन्यांतील 2 सामन्यांतच विजय मिळवला, तर 7 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे 4 गुणच राहिले.

शनिवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 307 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 44.4 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने पावणे दोनशे धावांची खेळी केली. त्याने 132 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकारांसह 177 धावांची खेळी केली.

बांगलादेशने दिलेल्या 307 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी ट्रेविस हेडची विकेट तिसऱ्याच षटकात गमावलेली. हेडला तस्किन अहमदने 10 धावांवरच त्रिफळाचीत केले होते.

मात्र, त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला मिचेल मार्शची साथ मिळाली. या दोघांनी शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 130 धावांचा टप्पा पार करून दिला. यावेळी मार्शने आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, वॉर्नर 23 व्या षटकात 53 धावांवर बाद झाला. त्याचा झेल मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर नजमुल हुसैन शांतोने पकडला.

पण त्यानंतरही मार्शचा घणाघात सुरू होता आणि त्याला स्टीव्ह स्मिथने भक्कम साथ दिली होती. त्यांच्यात 175 धावांची नाबाद भागीदारी झाली. यादरम्यान मार्शने शतक पूर्ण केले, तर स्मिथनेही अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवता आला. स्मिथने 64 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बांगलादेश प्रथम फलंदाजीलाठी उतरला. बांगलादेशने सुरुवात चांगली केली होती. मात्र, फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद होत गेले.

बांगलादेशकडून तौहिद हृदोयने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार नजमुल हुसैन शान्तोने 45 धावांची खेळी केली. त्याचबरोबर सलामीवीर तान्झिद हसन आणि लिटन दास यांनी प्रत्येकी 36 धावांची खेळी केली.

महमुद्दुलाह (32), मुश्फिकुर रहिम (21) आणि मेहदी हसन मिराज (29) यांनीही छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे बांगलादेशला 50 षटकात 8 बाद 306 धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून सीन ऍबॉट आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मार्कस स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT