Rohit Sharma World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाची विजयी वाटचाल सुरुच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 8 सामने जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
यंदाच्या स्पर्धेतील टीम इंडिया हा एकमेव संघ आहे, ज्याने एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाला आता पुढचा सामना 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जिंकून रोहितला मोठा विक्रम करण्याची संधी असेल. असा विक्रम जो एमएस धोनी आणि विराट कोहली देखील त्यांच्या नेतृत्वाखाली करु शकले नाहीत.
दरम्यान, विश्वचषकात टीम इंडियाला (Team India) रोखणे केवळ अवघडच नाही तर अशक्य वाटत आहे. टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
याआधी टीम इंडियाने 2003 विश्वचषकात सलग 8 सामने जिंकले होते. तेव्हा टीम इंडियाची धुरा सौरव गांगुलीच्या हातात होती. अशा स्थितीत टीम इंडियाने पुढच्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला तर विश्वचषकातील हा त्याचा सलग 9वा विजय असेल. यासह विश्वचषकात अशी कामगिरी करणारा रोहित भारताचा पहिला कर्णधार ठरणार आहे.
विश्वचषक (World Cup) स्पर्धेत सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर आहे. 2003 आणि 2007 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलग 11-11 सामने जिंकून ट्रॉफी जिंकली होती. रोहितला या विक्रमाशी बरोबरी साधायची असेल, तर नेदरलँड्सचा पराभव केल्यानंतर त्याला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत विजय मिळवावा लागेल, जे यावेळी प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे.
11 विजय - ऑस्ट्रेलिया (2003 आणि 2007)
8 विजय - भारत (2003 आणि 2023*)
8 विजय - न्यूझीलंड (2015)
7 विजय - भारत (2015)
7 विजय - न्यूझीलंड (1992)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.