Ellyse Perry - Phoebe Litchfield X/AusWomenCricket
क्रीडा

INDW vs AUSW: भारताचा दुसऱ्या T20I मध्ये पराभव, ऑस्ट्रेलियाने आव्हान राखले! 300 व्या सामन्यात पेरीचा विजयी षटकार

India Women vs Australia Women: ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवत मालिकेतील आव्हान कायम राखले आहे.

Pranali Kodre

India Women vs Australia Women, 2nd T20I match:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियम, नवी मुंबई येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधत आव्हान राखले आहे. आता 9 जानेवारी रोजी होणारा तिसरा टी20 सामना निर्णायक ठरणार आहे.

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 19 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एलिस पेरीने ऑस्ट्रेलियासाठी विजयी षटकात ठोकला.

विषेश म्हणजे हा पेरीचा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. ती 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू आहे.

या सामन्यात भारताने दिलेल्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हेली आणि बेथ मुनी यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर त्यांना मोठी खेळी करता आली नाही. दिप्ती शर्माने या दोघींनाही बाद केले. हेलीने 26 धावा आणि मुनीने 20 धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ताहलिया मॅकग्रानेही सुरुवात चांगली केली पण ती 19 धावा करून बाद झाली. तिच्या पाठोपाठ ऍश्ले गार्डनर 7 धावांवरच माघारी परतली. मात्र नंतर एलिस पेरीला फोबी लिचफिल्डची साथ मिळाली. या दोघींनी आक्रमक खेळत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. लिचफिल्डने नाबाद 18 धावा केल्या, तर पेरीने नाबाद 34 धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेतल्या, तर श्रेयंका पाटील आणि पुजा वस्त्राकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेत भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्या चार विकेट्स झटपट गमावल्या. शफाली 1 धाव करून बाद झाली, पाठोपाठ जेमिमा रोड्रिग्स 13 धावांवर बाद झाली. या दोघींनाही किम गर्थने बाद केले.

सुरुवात चांगली केलेली स्मृती मानधानाचा अडथळा ऍनाबेल सदरलँडने दूर केला. स्मृती 23 धावांवर बाद झाली. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरही फार काही करू शकली नाही. ती 6 धावांवरच बाद झाली.

नंतर ऋचा घोष आणि दिप्ती शर्माने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण ऋचाला 23 धावांवर 15 व्या षटकात जॉर्जिया वेरहॅमने पायचीत केले. तिनेच पुजा वस्त्राकरलाही 9 धावांवर बाज केले. 18 व्या षटकात अमनजोत कौरही 4 धावांवर बाद झाली.

नंतर श्रेयंकाने दिप्तीची साथ दिली, त्यामुळे भारताला 20 षटकात 8 बाद 130 धावांपर्यंत पोहचता आले. दिप्ती 27 चेंडूत 30 धावांवर अखेरच्या चेंडूवर धावबाद झाली. श्रेयंका 7 धावांवर नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ, वेरहॅम आणि सदरलँड यांनी गोलंदाजी करताना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच ऍश्ले गार्डनरने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT