INDW vs AUSW: भारताविरुद्धचा सामना एलिस पेरीसाठी विक्रमी! 'हा' पराक्रम करणारी पहिलीच ऑस्ट्रेलियन

Ellyse Perry Record: भारताविरुद्ध रविवारी होत असलेला दुसरा टी20 सामना ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू एलिस पेरीसाठी विक्रमी ठरला आहे.
Ellyse Perry
Ellyse PerryX/ICC

India Women vs Australia Women, 2nd T20I match, Ellyse Perry Record:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सध्या टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जानेवारी) होत आहे. हा सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियम, नवी मुंबई येथे खेळवला जात आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरीसाठी विक्रमी सामना आहे.

पेरीसाठी हा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्यामुळे ती 300 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे. तसेच एकूण चौथी महिला क्रिकेटपटू आहे. तिच्यापूर्वी असा विक्रम केवळ भारताची मिताली राज, इंग्लंडची शाललोट एडवर्ड्स आणि न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने केला आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे महिला क्रिकेटपटू

  • 333 सामने - मिताली राज

  • 309 सामने - शारलॉट एडवर्ड्स

  • 309 सामने - सुझी बेट्स

  • 300 सामने - एलिस पेरी

Ellyse Perry
IND W vs AUS W: तितासचा भेदक मारा, स्मृती-शफालीची शानदार बॅटिंग; पहिल्या T20 सामन्यात कांगारुंचा दारुण पराभव

पेरीचे आंतरराष्ट्रीय सामने

पेरीने आत्तापर्यंत 12 कसोटी सामने खेळले असून 925 धावा केल्या आहेत आणि 38 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तिने 141 वनडे सामने खेळले असून 3852 धावा केल्या आहेत आणि 162 विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय भारताविरुद्ध रविवारी होत असलेल्या सामन्यापूर्वी तिने 146 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 1774 धावा केल्या आहेत आणि 123 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक

रविवारी होत असलेल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने किम गार्थला डार्सी ब्राऊनच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तसेच भारताने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.

Ellyse Perry
INDW vs AUSW: भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचण्याची संधी! कधी अन् कुठे रंगणार दुसरा T20I, घ्या जाणून

भारताला मालिका विजयाची संधी

दरम्यान, भारताने या मालिकेतील पहिला सामना 9 विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्याचमुळे जर भारताने रविवारी होत असलेला दुसरा टी20 सामना जिंकला, तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिाविरुद्ध मायदेशात टी20 मालिका जिंकेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका सिंग.

  • ऑस्ट्रेलिया - एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, किम गर्थ, मेगन शट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com