Australia Dainik Gomantak
क्रीडा

Ashes Series 2023: बेन स्टोक्सची झुंज अपयशी! कांगारुंचा शानदार विजय, इंग्लंडचा 43 धावांनी पराभव

2nd Test, Ashes Series: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 155 धावांची मौल्यवान खेळी खेळली पण इंग्लंडला विजय मिळवता आला नाही.

Manish Jadhav

England vs Australia 2nd Test, Ashes Series: लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात (Ashes 2023) ऑस्ट्रेलियाने 5व्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडचा 43 धावांनी पराभव केला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 155 धावांची मौल्यवान खेळी खेळली पण इंग्लंडला विजय मिळवता आला नाही.

371 धावांचे लक्ष्य मिळाले होते

दरम्यान, धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या (110) शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. त्यांचा सलामीवीर बेन डकेटचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकले.

ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या डावात 279 धावा करत इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य दिले. कर्णधार बेन स्टोक्सच्या (155) शानदार शतकानंतरही इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 327 धावांत सर्वबाद झाला.

स्टोक्सचे शतक, डकेटसोबत भागीदारी

दुसरीकडे, 371 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा (England) कर्णधार बेन स्टोक्सने एक बाजू सांभाळली. त्याने 214 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि षटकारांसह 155 धावा काढल्या. तो संघाची 7वी विकेट म्हणून 301 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्याने बेन डकेट (112 चेंडूत 83) सोबत 5व्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. डकेटने आपल्या खेळीत 9 चौकार मारले. मिचेल स्टार्कने जॉश टंग ला (19) गोलंदाजी देताच इंग्लंडचा डाव आटोपला.

ऑस्ट्रेलियाची 2-0 अशी आघाडी

तसेच, या सामन्यात मिचेल स्टार्कने 6 विकेट घेतल्या. त्याने दोन्ही डावात 3-3 विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनीही दुसऱ्या डावात 3-3 बळी मिळवले.

यासह पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिली कसोटी 2 गडी राखून जिंकत 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉड्समधील हेडिंग्ले येथे 6 जुलैपासून खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT