Ashes Series, Tammy Beaumont: टॅमी बोमोंटने रचला इतिहास, इंग्लंडसाठी केला मोठा कारनामा

Tammy Beaumont: ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची स्टार फलंदाज टॅमी बोमोंटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावले आहे.
Tammy Beaumont
Tammy BeaumontDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes Series, Tammy Beaumont: ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची स्टार फलंदाज टॅमी बोमोंटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावले आहे. टॅमीने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा कारनामा केला.

विशेष म्हणजे, तिचे हे कसोटीतील पहिले द्विशतक आहे. कसोटीतील इंग्लिश महिला फलंदाजाने झळकावलेले पहिले द्विशतक आहे. ही धावसंख्या टॅमीने इंग्लंडच्या महिला संघाकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये केलेली सर्वोत्तम धावसंख्या आहे.

दरम्यान, टॅमीचे हे सलग दुसरे द्विशतक आहे. याआधी 15 ते 17 जून दरम्यान डर्बी येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) द्विशतक झळकावले होते. त्या सामन्यात टॅमीने 201 धावांची खेळी केली. 116 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टॅमीने एकच धाव घेतली होती.

Tammy Beaumont
Ashes Series: अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडला दुसरा मोठा झटका, 'हा' धाकड गोलंदाज दुखापतग्रस्त

दुहेरीने पहिले शतक बदलले

दुसरीकडे, टॅमीचा हा आठवा कसोटी सामना आहे. या सामन्यापूर्वी तिची सर्वोत्तम धावसंख्या 70 धावा होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात टॅमीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

ती द्विशतकात रुपांतर करण्यातही यशस्वी ठरली. टॅमीच्या या खेळीने इंग्लंड संघ मजबूत स्थितीत आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 473 धावा केल्या होत्या. या प्रचंड धावसंख्येसमोर इंग्लंडला (England) टॅमीने सांभाळले.

Tammy Beaumont
Ashes Series: संधी मिळताच ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूने केली कमाल

दुसरीकडे, तिने एक टोक पकडून संघाचा धावफलक चालू ठेवला. टॅमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा जोरदार सामना केला. नॅट शिव्हर आणि कर्णधार हीदर नाइट यांनी त्याला साथ दिली आणि अर्धशतकं झळकावले. टॅमीने शिव्हरसोबत 137 धावांची भागीदारी केली. त्याआधी तिने नाइटसोबत 115 धावांची भागीदारी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com