Ashes Series: अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडला दुसरा मोठा झटका, 'हा' धाकड गोलंदाज दुखापतग्रस्त

James Anderson Injury: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
James Anderson
James AndersonDainik Gomantak

James Anderson Injury: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जोफ्रा आर्चरनंतर आता अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतग्रस्त झाला आहे.

काऊंटी क्रिकेट खेळताना जिमीला दुखापत झाल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. या दुखापतीमुळे जेम्स अँडरसनचे आयर्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळणे साशंक आहे.

दरम्यान, सॉमरसेटविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना जेम्स अँडरसनला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुखापतीनंतर तो मैदानात परतला नाही. तो सामना अनिर्णीत संपला.

इंग्लंडला (England) पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळायची आहे. ज्यात जेम्स अँडरसनचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे तो मैदानात उतरतो की नाही हे पाहणे बाकी आहे. अँडरसन अ‍ॅशेस मालिकेसाठी तंदुरुस्त असावा, असे इंग्लिश संघाला नक्कीच आवडेल.

James Anderson
Ashes मालिकेदरम्यान घरगुती हिंसाचार प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला अटक

जेम्स अँडरसनने ही माहिती दिली

जेम्स अँडरसननेही दुखापतीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसी पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान जेम्स अँडरसन म्हणाला की, “मी माझ्या दुखापतीबद्दल चिंतेत नाही. दुखापत होणे हे कोणत्याही अर्थाने चांगले नाही, पण चांगली गोष्ट म्हणजे ही दुखापत तितकीशी गंभीर नाही. मला वाटते की मी काही आठवड्यांत पूर्णपणे तंदुरुस्त होईन.'

James Anderson
Ashes Series: संधी मिळताच ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूने केली कमाल

हा खेळाडूही जखमी झाला आहे

अ‍ॅशेस मालिका सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ दुखापतींशी सतत झुंजत आहे. IPL 2023 दरम्यान आघाडीचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर जखमी झाला. त्याचबरोबर कर्णधार बेन स्टोक्सही दुखापतीमुळे खेळू शकत नाही. अशा परिस्थितीत जेम्स अँडरसनच्या (James Anderson) दुखापतीने इंग्लंड क्रिकेट बोर्डाची चिंता वाढवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com