Mitchell Starc Dainik Gomantak
क्रीडा

Mitchell Starc practice for WTC Final: स्टार्क देतोय टीम इंडियाला टेंशन! नेटमध्ये बॉलिंग करताना उडवला लॅब्युशेनचा स्टंप

WTC Final ची तयारी करतानाचा मिचेल स्टार्कचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Pranali Kodre

Mitchell Starc net practice ahead of WTC Final 2023: पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया कसोटी संघ जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भारताविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

या सामन्यातासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ इंग्लंडला पोहोचले असून खेळाडूंची तयारीला सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू या अंतिम सामन्यासाठी कसून सराव करत आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

नुकताच आयसीसीनेही सरावादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. तो नेटमध्येही अगदी वेगात गोलंदाजी करताना दिसत आहे.

त्याने एका वेगवान चेंडूवर फलंदाज मार्नस लॅब्युशेनचा स्टंपही उडवला. त्याने ज्याप्रकारे त्रिफळाचीत केले, ते पाहून लॅब्युशेनही चकीत झालेला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

भारत दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची भारताची दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी 2019-21 दरम्यान कसोटी चॅम्पियनशीपचे पहिले पर्व खेळवण्यात आले होते, त्या पर्वातही भारताने अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.

भारताला आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रतिक्षा

वरिष्ठ भारतीय पुरुष संघ जवळपास गेल्या 10 वर्षापासून आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रतिक्षा करत आहे. भारतीय पुरुष संघाने अखेरीचे आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद 2013 साली मिळवले होते.

त्यावर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने अंतिम सामन्याच इंग्लंडला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली होती. पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात भारतीय संघाने अनेकदा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, मात्र विजेतेपद मिळवता आलेले नाही.

ऑस्ट्रेलियाला खेळणार ऍशेस

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघ केवळ कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठीच नाही, तर आगामी ऍशेस मालिकेसाठीही तयारी करत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका 16 जून पासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रील्स बनवणाऱ्या तरुणीला माकडानं शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘सस्त्यात सुटली’

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT