ISL football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

ATK Mohun Bagan vs FC Goa: एफसी गोवा कोणत्याही प्रतिस्पर्ध्यास हरवू शकतो; पण...

एटीके मोहन बागानविरुद्ध आज फातोर्ड्यात लढत

दैनिक गोमन्तक

पणजी: आपला संघ कोणत्याही प्रतिस्पर्ध्यास हरवू शकतो, पण मागील लढतीप्रमाणे चुका करता येणार नाही आणि सातत्यपूर्ण खेळ करावा लागेल, असे सांगत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी (ता. 20) एटीके मोहन बागानला जोरदार प्रतिकार करण्याचे संकेत दिले.

(ATK Mohun Bagan vs FC Goa match in Indian Super League football tournament)

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पूर्ण तीन गुण मिळविल्यास त्यांना तिसऱ्या क्रमांकाची संधी राहील. एटीके मोहन बागानचे पाच लढतीतून 10, तर एफसी गोवाचे तेवढ्याच सामन्यांत 9 गुण आहेत. एफसी गोवास मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सकडून 1-3 फरकाने हार पत्करावी लागली. मोहन बागानने स्पर्धेतील तिसरा विजय नोंदविताना नॉर्थईस्ट युनायटेडला 2-1 असे हरविले.

एफसी गोवा विजयाच्या शोधात

आयएसएल स्पर्धेत एटीके मोहन बागानविरुद्धच्या चार लढतीत एफसी गोवास अजूनही विजय नोंदविता आलेला नाही. गतमोसमात त्यांना दोन्ही लढतीत पराभव पत्करावा लागला होता. एफसी गोवाच्या बचावफळीत रविवारी परदेशी खेळाडू झळकण्याचे संकेत आहेत. सीरियन फारेस अर्नोट, स्पॅनिश मार्क व्हालेंते तंदुरुस्त असून संघासमवेत सराव करत असल्याची माहिती पेनया यांनी दिली.

फेर्रांडो यांची सावध प्रतिक्रिया

एटीके मोहन बागानचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेर्रांडो हे एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक आहेत. शिवाय कोलकात्याच्या संघातील ह्युगो बुमूस, मनवीर सिंग, लिस्टन कुलासो, लेनी रॉड्रिग्ज हे सुद्धा एफसी गोवाचे माजी हुकमी खेळाडू आहेत.

‘‘एफसी गोवा संघात चांगले नवे खेळाडू आहेत. प्रतिस्पर्धी समतोल असल्याने सामना कठीणच असेल. आमच्याकडेही चांगले खेळाडू आहेत. संघाने चांगला खेळ केला असला, तरी पूर्ण समाधानी नाही. प्रत्येक सामन्यागणिक प्रगती साधण्याचे लक्ष्य आहे,’’ अशी सावध प्रतिक्रिया फेर्रांडो यांनी दिली.

आकडेवारीत सामना...

  • एफसी गोवा व एटीके मोहन बागान यांच्यात एकूण 4 सामने

  • एटीके मोहन बागानचे 3 विजय, 1 सामना बरोबरीत

  • गतमोसमात एटीके मोहन बागानची एफसी गोवावर अनुक्रमे 2-1, 2-0 फरकाने मात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT