ATK Mohun Bagan in the semifinal Dainik Gomantak
क्रीडा

एटीके मोहन बागान उपांत्य फेरीत, सलग 15 सामने अपराजित

जमशेदपूरची नजर ‘शिल्ड’वर

दैनिक गोमन्तक

पणजी ः रॉय कृष्णा याच्या पूर्वार्धातील भरपाई वेळेतील गोलमुळे एटीके मोहन बागानने माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला 1-0 फरकाने निसटते हरविले आणि आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केला. स्पर्धेत सलग 15 सामने अपराजित राहण्याची किमयाही त्यांनी साधली. फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी सामना झाला.

फिजी देशाचा आंतरराष्ट्रीय आघाडीपटू रॉय कृष्णा याने 45+2व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. जॉनी कौको याच्या असिस्टवर कृष्णाने  चेन्नईयीनचा गोलरक्षक समिक मित्र याचा बचाव भेदला. मोसमात तंदुरुस्ती राखण्यासाठी संघर्ष करावा लागलेल्या कृष्णाचा हा 13 लढतीतील पाचवा गोल ठरला.

एटीके मोहन बागानने या विजयासह आयएसएल (ISL) स्पर्धेत सलग 15 सामने अपराजित राहिलेल्या एफसी गोवाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. एटीके मोहन बागानने सलग लढतीत आठ विजय व सात बरोबरीची नोंद केली आहे. गोव्याच्या संघाने ही किमया 2020-21 मोसमात आता एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक असलेल्या हुआन फेरांडो यांच्यात मार्गदर्शनाखाली साधली होती. एटीके मोहन बागानचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत दहावा विजय ठरला.

त्यामुळे त्यांचे 37 गुण झाले आणि उपांत्य फेरीही निश्चित झाली. त्यांचा आणखी एक सामना बाकी आहे. गुणतक्त्यात समान गुण झाल्यानंतर गोलसरासरीवर जमशेदपूर (+16) पहिल्या, तर एटीके मोहन बागान (+12) दुसऱ्या स्थानी आहे. दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीची मोहीम पराभवाने संपली. त्यांचा हा 20 लढतीतील दहावा पराभव ठरला. त्यामुळे 20 गुणांसह ते आठव्या क्रमांकावर कायम राहिले, सलग आठ सामने त्यांना विजय नोंदविण्यात अपयश आले.

जमशेदपूरची नजर ‘शिल्ड’वर

आयएसएल स्पर्धेच्या आठव्या मोसमात अव्वल राहून लीग विनर्स शिल्डसह एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याची जमशेदपूर एफसीला संधी आहे. सध्या त्यांचे 18 लढतीतून 37 गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील हैदराबाद (Hyderabad) एफसीच्या तुलनेत ते दोन गुणांनी आघाडीवर आहेत. शुक्रवारी (ता. 4) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर जमशेदपूरसमोर (Jamshedpur) ओडिशा एफसीचे आव्हान असेल. त्यावेळी सलग सहावा विजय नोंदविण्यासाठी ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघ इच्छुक असेल, अपेक्षित निकाल नोंदविल्यास त्यांचे अग्रस्थान आणखीनच भक्कम होईल. ओडिशाला मोसमात सातत्य राखता आलेले नाही. 19 लढतीनंतर त्यांचे 23 गुण असून सध्या सातवा क्रमांक मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT