कच्च्या तेलाच्या किमतींनी वाढवली चिंता, रिझर्व्ह बँकेने उचलले मोठे पाऊल

भारत आपल्या गरजेच्या 80% कच्च्या तेलाची करतो आयात
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रुपयाचे ढासळत चाललेले नियंत्रण सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठे पाऊल उचलले आहे. रुपयाच्या विनिमय दरातील मोठ्या प्रमाणात चढउतार लक्षात घेता, रिझर्व्ह बँकेने आपल्या परकीय चलन निधीतून सुमारे 2 अब्ज डॉलर विकणे अपेक्षित आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनी चिंता वाढवली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव वाढला आहे.

Russia-Ukraine War
फेसबुकमुळे बसला 8 लाखांचा गंडा, तिघांना अटक

याशिवाय जागतिक बाजारात तणावाचे वातावरण आहे. अशा स्थितीत रुपयाची स्थितीही ढासळली आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो, त्यामुळे डॉलरच्या विनिमय दरातील बदलामुळे देशांतर्गत चलनावर दबाव वाढतो. बातमीनुसार, रुपयाची ही कमजोर स्थिती पाहता, सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी (Bank) आरबीआयच्या वतीने स्पॉट मार्केटमध्ये डॉलरची विक्री केली आहे. घसरत चाललेला रुपया हाताळण्यासाठी आरबीआय डॉलर्स खरेदी करते, जेणेकरून त्याचे कच्च्या तेलाची (oil) आयात करणाऱ्या कंपन्यांवरील परिणाम कमी होऊ शकतो.

Russia-Ukraine War
BSNL चा नवीन प्लॅन फक्त 197 रुपयांमध्ये पण..

आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 112 डॉलरच्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या आठ वर्षांतील कच्च्या तेलाची ही सर्वोच्च पातळी आहे. भारत आपल्या गरजेच्या 80% कच्च्या तेलाची आयात करतो. हा व्यवहार डॉलरमध्ये होतो. याशिवाय रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्याचा परिणाम परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा खर्च, परदेशात प्रवास करण्यासाठी होणारा खर्च आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या आयातीवर होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com