Asif Afridi Dainik Gomantak
क्रीडा

Match Fixing: क्रिकेट विश्वात उडाली खळबळ, 'हा' गोलंदाज अडकला मॅच फिक्सिंगमध्ये; 2 वर्षांची बंदी

Match Fixing In Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एका खेळाडूवर भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 2 वर्षांची बंदी घातली आहे.

Manish Jadhav

Match Fixing In Cricket: पाकिस्तान क्रिकेटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एका खेळाडूवर भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 2 वर्षांची बंदी घातली आहे.

या खेळाडूवर लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मॅच फिक्सिंगच्या या दोषी खेळाडूवर आता 12 सप्टेंबर 2024 पर्यंत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्यात आली आहे.

या खेळाडूवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) डावखुरा फिरकीपटू आसिफ आफ्रिदीवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. आसिफ आफ्रिदीवर कलम 2.4.10 चे उल्लंघन केल्याबद्दल दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

तर कलम 2.4.4 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे, असे पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे. अपात्रतेचे दोन्ही कालावधी एकाच वेळी चालतील आणि पुढे जातील. 12 सप्टेंबर 2022 रोजी सुरु झालेल्या त्याच्या शेवटच्या निलंबनाच्या दिवसापासून हा कालावधी सुरु होईल.

आसिफ आफ्रिदीची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

आसिफ आफ्रिदीने 35 प्रथम श्रेणी, 42 लिस्ट ए आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 118, 59 आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) होम वनडे मालिकेसाठी आसिफ अलीचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला होता, परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

त्याचबरोबर, आसिफ आफ्रिदीने काश्मीर प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला होता. तिथे रावळकोट हॉक्स संघाकडून खेळताना त्याने मॅच फिक्सिंग केली. तो पीएसएलमध्ये मुलतान सुलतानकडून खेळला आहे.

नजम सेठी यांनी हे मोठे वक्तव्य केले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात पीसीबीला आनंद होत नाही, परंतु आम्ही अशा गुन्ह्यांबाबत झिरो टॉलरन्सचे धोरण बाळगतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT