PCB New Chief Selector: पाकिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा सिलेक्टर!

Pakistan Cricket Team: पाकिस्तानचा माजी फलंदाज हारुन रशीद याची राष्ट्रीय निवड समितीच्या मुख्य सिलेक्टर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket Team Dainik Gomantak
Published on
Updated on

PCB New Chief Selector: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मेन्स राष्ट्रीय निवड समितीच्या नव्या अध्यक्षाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज हारुन रशीद यांची राष्ट्रीय निवड समितीचे मुख्य सिलेक्टर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी सोमवारी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हारुन नवीन निवड समितीचे प्रमुख असतील, परंतु उर्वरित सदस्य नंतर ठरवले जातील.

आफ्रिदीनंतर जबाबदारी मिळाली

22 डिसेंबर रोजी 14 सदस्यीय क्रिकेट व्यवस्थापन समितीमध्ये हारुन यांचा समावेश करण्यात आला होता. सेठी म्हणाले, "हारुन यांनी व्यवस्थापन समितीचा राजीनामा दिला आहे, कारण त्यांना हितसंबंधांचा संघर्ष नको आहे." क्रिकेट व्यवस्थापन समितीने शाहिद आफ्रिदी यांची अंतरिम मुख्य सिलेक्टर्स म्हणून नियुक्ती केली होती.

Pakistan Cricket Team
Pakistan Cricket: 'PCB हिंदूंचा द्वेष करते...' पाक क्रिकेटपटूचे वक्तव्य; BCCI कडे मागितली मदत

आफ्रिदीने वसीम यांची जागा घेतली होती

मोहम्मद वसीम यांना पदावरुन हटवल्यानंतर शाहिद आफ्रिदी यांनी अलीकडेच अंतरिम मुख्य सिलेक्टर्स म्हणून पदभार स्वीकारला होता. राशिद यांनी यापूर्वी PCB चे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक आणि संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. 2015 आणि 2016 मध्ये पुरुष संघासाठी मुख्य सिलेक्टर्स म्हणूनही काम केले आहे.

Pakistan Cricket Team
Ramiz Raja: बीसीसीआयला धमकावणाऱ्या रमीझ राजा यांची हकालपट्टी! 'हा' व्यक्ती PCB चा नवा अध्यक्ष

हारुन यांनी सांगितले की, ''ही जबाबदारी दिल्याने मी आभारी आहे.” हारुन इतर प्रमुख मालिकेसह भारतात (India) होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवरही लक्ष ठेवतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com